Viral Video : नाचता नाचता Heart Attack आल्यामुळे महिलेचा मृत्यू

Watch Viral Video, Woman dies of heart atatck while dancing in Seoni district of Madhya Pradesh : नाचता नाचता हार्ट अॅटॅक आल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Watch Viral Video, Woman dies of heart atatck while dancing in Seoni district of Madhya Pradesh
Viral Video : नाचता नाचता Heart Attack आल्यामुळे महिलेचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Video : नाचता नाचता Heart Attack आल्यामुळे महिलेचा मृत्यू
  • घटना मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील बखारी गावातील
  • नाचत असलेल्या महिलांपैकी मागच्या कोपऱ्यातील महिला अचानक मंचावर कोसळली

Watch Viral Video, Woman dies of heart atatck while dancing in Seoni district of Madhya Pradesh : नाचता नाचता हार्ट अॅटॅक आल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

ज्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ती घटना मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील बखारी गावातील आहे. बखारीमध्ये एका लग्नाचा संगीत सोहळा सुरू होता. या सोहळ्यात मंचावर निवडक महिला संगीताच्या तालावर नाचत होत्या. कार्यक्रम उत्साहात सुरू होता. 

नाचत असलेल्या महिलांपैकी मागच्या कोपऱ्यातील महिला अचानक मंचावर कोसळली. नाचता नाचता मंचावर कोसळलेल्या महिलेच्या हालचाली थंडावल्या. ती उठून पुन्हा उभी राहिली नाही. हा प्रकार बघून सोहळ्याला उपस्थित असलेल्यांची धावपळ सुरू झाली. मंचावर कोसळलेल्या महिलेला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाला, अशी माहिती दिली. ज्या महिलेचा मृत्यू झाला ती साठीच्या घरात होती. 

बखारी गावात बुधवार 14 डिसेंबर 2022 रोजी एका लग्नाचा संगीत सोहळा सुरू होता. या सोहळ्यात सहभागी झालेल्या निवडक महिला संगीताच्या तालावर नाचत होत्या. कार्यक्रम उत्साहात सुरू होता.... सर्व काही सुरळीत सुरू असताना नाचत असलेल्या महिलांपैकी मागच्या कोपऱ्यातील महिला अचानक मंचावर कोसळली. नाचता नाचता मंचावर कोसळलेल्या महिलेच्या हालचाली थंडावल्या. ती उठून पुन्हा उभी राहिली नाही. 

नाचणारी महिला अचानक मंचावर कोसळली आणि तिच्या हालचाली थांबल्या हे बघून उपस्थित असलेले चक्रावले. महिलेची वैद्यकीय तपासणी झाली त्यावेळी तिचा नाचताना हार्ट अॅटॅक आल्यामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

याआधी पण नाचताना अचानक हार्ट अॅटॅक आल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एका कार्यक्रमात हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीचा पण नृत्य करत असतानाच हार्ट अॅटॅक आल्यामुळे मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओ पण व्हायरल झाला होता.

मध्यंतरी आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात एक तरुण मित्रांसोबत चालत एका गल्लीतून जात होता. चालता चालता हार्ट अॅटॅक आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.

VIDEO: वरमाला घालताच नववधूला ह्रदयविकाराचा झटका, स्टेजवरच कोसळली अन्....

Heart Attack: हिवाळ्यात सर्वाधिक असतो हार्ट अ‍ॅटकचा धोका, अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याआधी 1 महिना अगोदर शरीर देते हे संकेत...ही 11 लक्षणे दिसली तर लगेच व्हा सावध

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी