कुंकू लावताना नवरीला भुरळ येताच नवरदेवाने मंडपाबाहेर ठोकली धूम

सध्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच कारच्या बोनेटवर बसलेल्या नवरीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

wedding video groom ran away after seeing the bride watch trending viral video
नवरीला चक्कर आलेली पाहून नवरदेव झाला पसार   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • नवरीला चक्कर आलेली पाहून नवरदेव झाला पसार
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका लग्न समारंभाचा आहे.
  • इंस्टग्रामवर निरंजन महापात्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

नवी दिल्ली : सध्या लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच कारच्या बोनेटवर बसलेल्या नवरीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला यात नवरदेवाची करामत पाहण्यास मिळत आहे. या नवरदेवाची करामत पाहून सर्वांना आपल्या कपाळावर हात मारावा लागला. नवरीला कुंकू लावत असतानाच नवरदेवाने लग्न मंडपातून धूम ठोकल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका लग्न समारंभाचा आहे. नवरीच्या कपाळी कुंकू लावण्यासाठी नवरदेव उभा राहतो. तेव्हा नवरी मुलीला काही तरी त्रास होतो. त्यानंतर ती जमिनीवर पडून जाते. हे पाहून नवरदेव घाबरतो आणि गळ्यातील वरमाला काढून तो थेट मंडपाच्या बाहेर पळत सुटतो. नवरदेवाचं हे कृत्य पाहून मंडपातील उपस्थित लोकांनी आपल्या कपाळी हात मारुन घेतला.  दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. इंस्टग्रामवर निरंजन महापात्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. साधरण 12 हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केल आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी