आयपीएस ऑफिसरची प्रेरणादायी 'वेट लॉस' कहाणी, ४६ आठवड्यात कमी केले ४३ किलो वजन

व्हायरल झालं जी
Updated May 31, 2021 | 20:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

१३४ किलो वजन असणाऱ्या विवेक राज सिंह कुकरेले या पोलिस अधिकाऱ्याने आपले वजन ४३ किलोंनी कमी केले आहे. या आपल्या प्रवासाचे वर्णन करणारी पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली आहे. आपले फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

Vivek Raj Singh Kukrele , IPS
विवेक राज सिंह कुकरेले या आयपीएस अधिकाऱ्याची वेट लॉसची कहाणी  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • लहानपणापासून प्रचंड लठ्ठ
  • नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण
  • चालण्यातून झाली वजन कमी करण्याची सुरूवात

नवी दिल्ली : वाढलेले वजन (OverWeight), सुटलेले पोट (Weight gain) ही हल्ली अनेकांची तक्रार झाली आहे. जीवनशैलीमधील ताणतणाव, फास्टफूडचे वाढते प्रमाण, खाण्यावर नियंत्रण नसणे, व्यायामाचा (Exercise)अभाव इत्यादी कारणांमुळे अनेकांना वजनवाढ (Fattiness), सुटलेले पोट (Obesity) या समस्यांना तोंड द्यावे लागत असते. मात्र वजन कमी करून प्रमाणबद्ध शरीर कसे मिळवायचे हा अनेकांपुढील प्रश्न असतो. वेट लॉसच्या (Weight Loss) या महत्त्वाच्या मुद्दयासंदर्भात एक प्रेरणादायी कहाणी आहे एका आयपीएस ऑफिसरची (IPS Officer). होय ही कहाणी आहे एका आयपीएस म्हणजेच पोलिस अधिकाऱ्याची. १३४ किलो वजन असणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याने आपले वजन ४३ किलोंनी कमी केले आहे. या आपल्या प्रवासाचे वर्णन करणारी पोस्ट त्यांनी फेसबुकवर (Facebook) टाकली आहे. अनेकांचे लक्ष या पोस्टने वेधून घेतले आहे. तुम्हालाही जर वजन कमी करायचे असेल तर या पोलिस अधिकाऱ्याची पोस्ट (Facebook Post) तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते. या आयपीएस ऑफिसरचे नाव आहे, विवेक राज सिंह कुकरेले. (Vivek Raj Singh Kukrele , IPS) विवेक राज सिंह कुकरेले हे एक आयपीएस अधिकारी आहेत. आपले फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत. लठ्ठ असतानाचे आणि आता प्रमाणबद्ध शरीर कमावल्यानंतरचे दोन्ही फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. (Weight Loss by IPS Officer : Vivek Raj Singh Kukrele, an IPS office shared his weight loss journey on Facebook)

लहानपणापासून प्रचंड लठ्ठ


विवेक राज सिंह हे लहाणपणापासूनच प्रचंड खादाड होते आणि त्यामुळे प्रचंड लठ्ठ झाले होते. शाळेत असताना त्यांचे वय ८८ किलोवर पोचले होते. त्याविषयी ते म्हणतात, 'लहानपणापासून लठ्ठ असल्यामुळे जाडजूड असणे माझ्यासाठी नेहमीचेच झाले होते, शिवाय त्यामुळे मी गोंडसदेखील वाटायचो. आठवीत माझे वजन तब्बल ८८ किलो होते. त्यामुळे मी माझे वय करायचे टाळायचो. नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये (एनपीए) ट्रेनिंगसाठी जाईपर्यत मी वजन करणे टाळतच होतो. 

नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण


आयपीएस म्हणून निवड झाल्यावर विवेक राज सिंह यांनी नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये कठोर प्रशिक्षणासाठी दाखल व्हावे लागले. तिथे त्यांची कसोटीच लागली. विवेक राज सिंह म्हणतात, 'नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये मी दाखल झालो तेव्हा माझे वजन १३४ किलो होते. आमचे ट्रेनिंग सुरू झाले आणि नॅशनल पोलिस अकॅडमीमधील कठोर प्रशिक्षणानंतर माझे वजन कमी झाले आणि मी बाहेर पडलो तेव्हा माझे वय १०४ किलो होते. माझ्यासाठी ते एक मोठे यशच होते. माझ्या पोलिस दलातील सुरूवातीच्या दिवसांमध्ये माझी पोस्टिंग बिहारमधील नक्षलग्रस्त भागात झाली होती. त्याचा परिणाम हिंडण्याफिरण्यावर झाला आणि माझे वजन वाढून १३८ किलोवर पोचले. मुळात मी खाण्यापिण्याचा शौकिन आहे आणि मी खूप खायचो. ‘खाना फेंकना नहीं चाहिए’ हे माझे कायमच ब्रीदवाक्य होते. कोणताही विचार न करता भरपूर खाणे, अगदी पोट भरल्यावरसुद्धा खाणे, हे माझ्या लठ्ठपणाचे मुख्य कारण होते.' 

चालण्यातून झाली वजन कमी करण्याची सुरूवात 


पोलिस दलात दाखल झाल्यावरही विवेक राज सिंह कुकरेले हे लठ्ठच होते. मात्र आपल्या सरकारी कामानिमित्त त्यांना चालावे लागले आणि त्यातून त्यांच्या वेटलॉसची कहाणी सुरू झाली. याबद्दल विवेक राज सिंह सांगतात की, 'पोलिस दलात मी माझे वजन ८ ते ९ किलोंनी कमी केले आणि पुढील ९ वर्षे जवळपास १३० किलोवर माझे वजन स्थिर होते. दरम्यान माझ्या कामानिमित्त मला चालावे लागत होते आणि स्टेप सेट गो या वॉकिंग अॅपचा मला फायदा झाला. माझ्यासाठी एका कॅटालिस्टचे काम या अॅपने केले आणि मी आणखी चालण्यास सुरूवात केली. चालणे हा माझ्या जीवनाचा भाग झाला आणि माझे वय कमी होण्यास सुरूवात झाली. हळूहळू वजन कमी होण्यास सुरूवात झाल्यामुळे ज्यामुळे स्नायू बळकट होतील असे इतरही व्यायाम प्रकार मी करण्यास सुरूवात केली. विचारपूर्वक खाण्यामुळे माझ्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना चांगलेच बळ मिळाले. मागील काही महिन्यांपासून मी माझ्या आहारात घट केली. विचारपूर्वक खाऊ लागलो, त्याचा परिणाम माझे शरीर प्रमाणबद्ध होण्यात झाला.'

लठ्ठपणामुळे रक्तदाबाचा त्रास


जास्त वजन असल्यामुळे विवेक राज सिंह यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता. त्यासाठी औषधे घ्यावी लागत होती. मात्र वजन कमी केल्यास हे दुखणेही आटोक्यात आले. ते म्हणतात,'मी आतापर्यत ४३ किलो वजन कमी केले आहे आणि यापुढेही मला माझे शरीर प्रमाणबद्धच ठेवायचे आहे. फेसबुकवरील एक ग्रुप एफआयटीटीआर (Facebook group FITTR)मुळे मला चांगलीच मदत झाली. त्यामुळे योग्य पोषक आहार आणि त्याचे माझे शरीर प्रमाणबद्ध ठेवण्यातील महत्त्व लक्षात आले. माझे वजन जास्त असल्यामुळे मला रक्तदाबाचा त्रास होत होता आणि रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात ठेवण्यासाठी मला औषधे घ्यावी लागत होती. आता माझा रक्तदाब (BP)नियंत्रणात आहे. त्यात आणखी एक आनंदाची बाब म्हणजे माझा रेस्टिंग पल्स रेट ४० बीपीएम आहे.'
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी