Fish Viral Video: हे जग विचित्र गोष्टींनी भरले आहे. अनेकवेळा तुम्हाला येथे अशा गोष्टी पाहायला मिळतील, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जातं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एका माशाला (Fish) चक्क दोन तोंड आणि चार डोळे असल्याचं पाहायला मिळतं आहे. या विचित्र माशाचा फोटो पाहून लोक थक्क झाले आहेत. त्यांना अद्यापही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीए. तसेच लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. (weird fish with 2 mouth and 4 eyes seeing will not believe in the eyes video goes viral)
आजपर्यंत तुम्ही फक्त दोन डोळे आणि एक तोंड असलेले असंख्य मासे पाहिले असतील. पण, आजकाल असा एक मासा असा चर्चेत आहे, जो दिसायला खूपच विचित्र आहे. या माशाने लोकांनाही हैराण केलं आहे.
अधिक वाचा: पोलीस भरतीबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती हातात मासा धरलेला दिसून येईल. यावेळी अचानक मासा आपला तोंड उघडतो. सुरुवातीला त्याच्या तोंडाखाली लहान गुहेसारखा भाग दिसतो. त्याच वेळी, डोळ्यांवर थोडासा निळसरपणा येतो.
अधिक वाचा: Pawri Girl Video: पुन्हा ‘पावरी गर्ल’ची धमाल, नवा व्हिडिओ करतोय कमाल
काही लोकांच्या मते, माशाच्या शरीरावर अनेक जखमा आहेत, तर काही लोक म्हणतात की, तो चेर्नोबिल दुर्घटनेच्या रेडिएशनचा बळी आहे. त्यामुळे ही काही जखम नाही. पण असे घडले असते तर आतापर्यंत मासा मेला असता, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाहा व्हिडीओ:
माशाला नेमकं काय झालंय?
व्हिडीओ (Trending Video) पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल. लोकांना अद्यापही या माशाचे नेमकं सत्य काय आहे हे समजलेले नाही. दोन तोंड असलेला मासा पाहून तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ 'होली मदर ऑफ कार्प' (Holy Mother of Carp) या नावाने ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 5400 पेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. तर या माशाबद्दल तुमचे मत काय आहे, कमेंट करून नक्की आम्हाला सांगा.