Weird Love Story 25 years old girl marriage with 71 year old man : प्रेमात माणूस आंधळा होतो... प्रेमात माणूस वेडा होतो... प्रेमात सारं काही माफ असतं... असं तुम्ही ऐकलं असेल पण प्रेमापोटी ७१ वर्षांच्या पुरुषाशी पंचविशीच्या तरुणीने लग्न केल्याचं कधी ऐकलंय का?... ऐकलं नसेल तर आता ऐका....
Monkeypox Disease: सेक्स केल्याने देखील 'मंकीपॉक्स' विषाणू पसरू शकतो, तज्ञांनी दिला इशारा
जाणून घ्या दीपिकाच्या मानेवरील टॅटू पुसट होण्यामागचे रहस्य
पंचविशीची डॅनियल आणि ७१ वर्षांचे रेकी मास्टर हावर्ड रीफ. डॅनियलला एक गंभीर आजार झाला होता. कितीही तास झोपली तरी डॅनियलला कायम थकल्यासारखे वाटायचे. सतत सांधे दुखायचे आणि सुजायचे. अनेक डॉक्टरांकडे जाऊन उपचार करुन घेतले तरी डॅनियलच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर २०१९ मध्ये डॅनियलने हावर्डसोबत एक रेकी सेशन केले. हावर्डने रेकी केल्यानंतर डॅनियलला पहिल्यांदा थोडे बरे वाटू लागले. यानंतर पुढचे काही दिवस नियमितपणे उपचार घेतल्यावर डॅनियलची तब्येत सुधारली. उपचार काळात वारंवार हावर्डच्या संपर्कात आलेल्या डॅनियलच्या मनात प्रेमाचे विचार घोळू लागले. कायम हावर्डसोबत राहावे असे डॅनियलला वाटू लागले. अखेर डॅनियलने मनातील विचार हावर्डसमोर व्यक्त केले आणि त्याला त्याचे वय विचारले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी हावर्ड ६८ वर्षांचा होता. पण वयाचे मोठे अंतर असूनही डॅनियलने हावर्डसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर कोण काय म्हणेल याचा विचार करणे सोडून देऊन डॅनियल आणि हावर्ड एकत्र राहू लागले. दोघांनी लग्न केले. अनेकजण खासगीत डॅनियल आणि हावर्ड या जोडीला नात आणि आजोबा यांची जोडी असे चिडवतात. पण या प्रकाराकडे दुर्लक्ष करून डॅनियल आणि हावर्ड हे दांपत्य आनंदात जगत आहे.