Nano Solar Car: भारतात टॅलेंटची कमतरता नाही. देशात गल्ली पासून दिल्ली पर्यंत नवीन गोष्टी आणि टॅलेंटेड माणसं बघायला मिळतात. अशातच पश्चिम बंगालमधील एका युवकाने भारतीय जुगाड करून सौर उर्जेवर चालणारी एक कार तयार केली आहे. या कारचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीने पेट्रोलच्या किंमतीला कंटाळून स्वत:ची Tata Nano कार सौरऊर्जेवर चालवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला आहे.
बांकुराच्या मनोजितने सोलर कार बनवून प्रभावित केले
पश्चिम बंगालच्या बांकुरा येथील रहिवासी असलेला मनोजित मंडल व्हिडिओमध्ये सौरऊर्जेवर चालणारी कार चालवताना दिसत आहे. या कारला पेट्रोलची अजिबात गरज लागत नाही. याशिवाय ही कार इंजिनवरही चालत नाही. या कारची रनिंग कॉस्टही सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. केवळ 30 ते 35 रुपयांमध्ये 100 किलोमीटरचा प्रवास करणारी ही ‘सोलर कार’सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
अधिक वाचा: अजब लग्नाची गजब गोष्ट! दोन बायकांनी नवऱ्याला 3-3 दिवस घेतलं वाटून आणि सातव्या दिवशी...
30 रुपयांमध्ये 100 किमी धावणार
मनोजित मंडल याला लहानपणापासूनच काही तरी नवीन करण्याची इच्छा होती. अशातच पेट्रोलच्या किंमती वाढल्या म्हणून तक्रार न करता त्याने स्वत:साठी एक सौर वाहन तयार केले आहे. या कारला मॉडिफाय करताना मनोजितला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा हा प्रयोग करताना त्याला अपयश देखील आले. मात्र तो निराश झाला नाही आणि त्याने आपले प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले.
अधिक वाचा: Video : चक्क गाजरापासून बनवली सनई, संगीत ऐकून आनंद महेंद्रा झाले मंत्रमुग्ध
‘नो पेट्रोल, सोलर कार… द कार ऑफ फ्युचर’
सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशातच बांकुराच्या मनोजित मंडलने सौरऊर्जेवर चालणारी कार तयार करून या समस्येवर नवा उपाय शोधला आहे. या कारचा प्रति किलोमीटर खर्च केवळ 80 पैसे आहे. इंजिन नसल्यामुळे गाडीचा आवाजही येत नाही. 4थ्या गिअरमध्ये ही वंडर कार सुमारे 80 किमी/ताशी वेगाने धावू शकते. मनोजितने तयांच्या कारला ‘नो पेट्रोल, सोलर कार… द कार ऑफ फ्युचर’ असे नाव दिले आहे.