Textbook advocating the benefits of dowry : नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर हुंडा पद्धतीवरुन युद्ध पेटलं आहे. ट्विटवर या विषयीची एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. हुंडा पद्धत किती भयानक असल्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे, परंतु एका पुस्तकात हुंडा घेण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. पोस्टवरुन ट्विटर नवीन वादाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान ही पोस्ट @chhuti_is नावाच्या ट्विटर अंकाउंटवरुन 3 एप्रिलला शेअर केली आहे. फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, भारतातील महाविद्यालयातील पाठ्यपुस्तक. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली असून हुंडा पद्धत परत चर्चेत आली आहे. पुस्तकातील जो पाठ शेअर करण्यात आलेला आहे, यात हुंडा पद्धतीचं फायदे काय आहेत, सांगितले आहेत. आतापर्यंत या पोस्टला 10 हजारांहून अधिक लाईक्स, 2.8 हजार रिट्विट्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. या प्रकरणावर लोक सतत प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
त्यांनी पुढील ट्विटमध्ये दावा केला आहे की, भारतातील एका आघाडीच्या 'टेक्स्ट बुक पब्लिशिंग हाऊस'चे आहे. समाजशास्त्र या विषयाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या लेखिकेचं नाव टीके इंद्राणी असून अॅमेझॉनवर पुस्तकाला 4.5 ची रेटिंग आहे. वादग्रस्त विधान पाठ क्रमांक 6 असून पान नंबर 122 वर आहे.
1. नवीन घर उभारण्यासाठी हुंडा उपयुक्त ठरतो.
भारतातील काही भागांमध्ये घरगुती वस्तू हुंडा म्हणून देण्याची परंपरा आहे. या अंतर्गत फ्रीज, भांडी, कपडे, दूरदर्शन, पंखा, गादी, पलंग अगदी वाहन देखील मिळत असते.
2. वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा.
मुलीला वडिलोपार्जित संपत्तीचा काही भाग हुंडा म्हणून मिळतो.
3. मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार वाढला
हुंड्याच्या ओझ्यामुळे अनेक पालक आपल्या मुलींना शिक्षण देऊ लागले आहेत. कारण जेव्हा मुली शिक्षित होतात किंवा नोकरी करतात तेव्हा हुंड्याची मागणीही कमी होते. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा होतो.
4. ज्या मुली सौंदर्याच्या सामाजिक मानकांशी जुळत नाहीत त्यांचे लग्न आकर्षक हुंड्यामुळे चांगल्या किंवा सरासरी दिसणाऱ्या मुलाशी केले जाऊ शकते.
.आणि ते शाळेचे पुस्तक आहे!