Girls on Google : मुंबई : सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट आहे. स्मार्टफोन न वापरणार्यांची संख्या तशी फारच कमी. बहुतांश लोक इंटरनेटवर आपल्या वेळ सोशल मीडिया आणि आवडीच्या वस्तू घेण्यासाठी घालवतात. त्यात मुलांच्या तुलनेत मुली जास्त इंटरनेटवर वेळ घालवतात असा निष्कर्ष काही अभ्यास आणि सर्वेक्षणातून समोर आले आहेत. गुगल इंडियाच्या एका नव्या अहवालानुसार देशात १५ कोटी इंटरनेट वापरकर्त्यांपैक्की ६ कोटी या महिला आहेत. महिला इंटरनेटवर आपल्या आवडीच्या वस्तू घेण्यासाठी आणि आपले दैनंदिन आयुष्य अधिक सुलभ आणि सुखी कसे व्हावे यासाठी वेळ देतात. तसेच इंटरनेट वापरणार्यांपैकी ७५ % महिला या १५ ते ३४ या वयोगटातील आहेत.
अमेरिकेच्या Pew internet research नुसार ३१ टक्के किशोरवयीन मुल आणि मुली इंटरनेटवर डाएटिंग आणि फिट राहण्याबाबत सर्च करतात. तर १७ टक्के लोक सेक्स, डिप्रेशन आणि ड्रग्सबद्दल सर्च करतात.
बहुतांश मुली इंटरनेटवर करियर संबंधित माहिती गोळा करतात. ज्या तरुणी लहानपणापासून आपल्या करीअरसाठी मेहनत घेत असतात त्या इंटरनेटवर ऑनलाईन कोर्स, नोकरी आणि व्यावसायिक संधीबद्दल शोध घेत असतात.
फक्त करीअरच नाही तर सुंदर दिसण्यासाठी मुली गुगलकडूनच ब्युटी टिप्स घेतात. ऑनलाईन शॉपिंग, कपड्यांचे नवनवीन डिझाईन्स, नवे कलेक्शन आणि फेस्टिव्ह ऑफर्स जाणून घेण्यासाठी मुली उत्सुक असतात. २०१३ साली Center for Media Research study मधूनही हे निष्कर्ष समोर आले होते. सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मुली प्रयत्नशील असतात, त्यासाठी मुली इंटरनेटवर फॅशन ब्युटी टिप्स, ट्रेंड्स आणि घरच्या घरी सुंदर दिसण्यासाठी काय उपाय करता येईल याच इंटरनेवर शोध घेत असतात.
अनेक मुलींना मेंदीबद्दल प्रेम असतं. लग्न असो वा सण अशा वेळी मेंदी लावणे आलेच. तेव्हा मुली आवर्जून गुगलवर मेंडीच्या नवनवीन आणि सुंदर डिझाईन्स शोधतात. तसेच संगीत आणि गाणी ऐकणे प्रत्येकाला आवडतंच. परंतु मुलींना रोमँटिक गाणी ऐकायला जास्त आवडतं. म्हणून मुली ऑनलाईन रोमँटिक आणि प्रेमाच्या गाणी सर्च करतात. फक्त मुलांना शायरी आवडते असा गैरसमज आहे, मुलींनाही शायरी आणि कवितांमध्ये रस असतो. मुली आवर्जून शायरी, प्रेमाचे मेसेज आणि सुविचार सर्च करतात.