Money Raining on Highway: जेव्हा अचानक महामार्गावर नोटांचा पाऊस सुरु होतो तेव्हा लोकांना प्रचंड आश्चर्य वाटणं हे साहजिक आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हायवेवर नोटांचा पाऊस पडताना दिसत आहे. ज्यावेळी नोटांचा पाऊस पडत होता त्यावेळी महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी झाला. सर्वात आश्चर्यकारक दृश्य म्हणजे, रस्त्यावर पडणाऱ्या नोटा उचलण्यासाठी चक्क पोलीस पुढे-पुढे पळत-पळत होते. हे संपूर्ण दृश्य पाहून लोक हैराण झाले. मात्र, या प्रकरणाचे सत्य वेगळेच आहे.
दरोडेखोरांनी पैशांनी भरलेली बॅग महामार्गावर दिली फेकून
वास्तविक, चिलीमध्ये दरोडेखोरांनी भरपूर पैसे लुटले आणि ते पळून जाऊ लागले. यावेळी पोलिसांचे पथक या दरोडेखोरांच्या मागे गेले असता दरोडेखोरांनी पैशांनी भरलेली बॅग महामार्गावर फेकून दिली. दरोडेखोरांनी नोटांनी भरलेली बॅग रस्त्यावर फेकल्याचे व्हिडीओमध्ये देखील दिसत आहे. ज्यामधून नोटा उडत आहेत. यानंतर पोलिसांच्या पथकाला त्यांची गाडी थांबवून नोटा जमा कराव्या लागल्या.
व्हिडीओतील हे दृश्य पाहून हायवेवर नोटांचा पाऊस पडतोय अशाच स्वरुपाचं दृश्य पाहायला मिळालं. यावेळी दरोडेखोरांनी जे पैसे फेकले होते तेच पैसे पोलीस येऊन उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरोडेखोरांनी एका जुगाराच्या अड्ड्यावर दरोडा टाकला होता. हेच पैसे घेऊन ते पळ काढत होते. मात्र, पोलीस पाठलाग करत असल्याचे दिसताच त्यांनी पैशाने भरलेली बॅग हायवेवर फेकून दिली.
व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, दरोडेखोर हे पुढे पळत होते तर पोलीस हे कारने त्यांचा पाठलाग करत होती. ही घटना चिलीच्या पुडाहुएल शहरातील आहे. वास्तविक, पैशांनी भरलेली एक बॅग महामार्गावर फेकली तर पोलिसांच्या हातून आपली सुटका होईल, असा दरोडेखोरांचा कयास होता.
अधिक वाचा: निर्मात्या पतीला पत्नीने मॉडेलसोबत रंगेहाथ पकडले, आणि....
मात्र, असं असतानाही 6 संशयित हे पोलिसांच्या नजरेतून सुटू शकले नाही. चिलीतील सॅंटियागो शहरातून पोलिसांनी त्या सहाही दरोडेखोरांना अटक केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ट्विटरवरील अनेक अकाऊंटद्वारे सोशल मीडियावरून ते शेअर करण्यात आले. यावेळी पोलिसांपासून दूर जाण्यासाठी दरोडेखोरांनी बॅगची झिप उघडून रस्त्यावर फेकल्याचे पाहायला मिळते. दरोडेखोरांनी 10 मिलीयन चिली पेसोस म्हणजे सुमारे 10,300 डॉलर लुटले होते.