Where is Kailas ? : कुठे आहे कैलासा? कसा बनवला नित्यानंदांनी हा देश, काय आहेत सुविधा

व्हायरल झालं जी
Updated Mar 06, 2023 | 14:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Where is Kailas ? : कैलासा नावाचा कोणता देश अस्तित्वात आहे का ? आणि जर असेल तर कुठे आहे कैलासा ? वादग्रस्त संत नित्यानंद यांनी गेल्या महिन्यात युनायटेड नेशन्सच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कैलासाचे प्रतिनिधी पाठवले तेव्हापासून हे सर्व चर्चेत आहे.

Where is Kailash, how did Nityananda build this country and what are the facilities here
 कैलासाची स्थिती काय आहे ?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • बलात्कार आणि अपहरणाचा आरोप असलेला नित्यानंद 2019 मध्ये भारतातून फरार
  • त्याने युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा (USK) नावाचा स्वतःचा देश तयार केला
  • प्रत्यक्षात हा देश कुठे आहे, हे कोणालाच माहीत नाही

Where is Kailas ? : कैलासा नावाचा कोणता देश अस्तित्वात आहे का ? आणि जर असेल तर कुठे आहे कैलासा ? वादग्रस्त संत नित्यानंद यांनी गेल्या महिन्यात युनायटेड नेशन्सच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कैलासाचे प्रतिनिधी पाठवले तेव्हापासून हे सर्व चर्चेत आहे. बलात्कार आणि अपहरणाचा आरोप असलेला नित्यानंद 2019 मध्ये भारतातून फरार झाला आणि त्यानंतर वर्षभरानंतर लोकांसमोर आला. त्याने दावा केला की त्याने युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा (USK) नावाचा स्वतःचा देश तयार केला आहे. प्रत्यक्षात हा देश कुठे आहे, हे कोणालाच माहीत नाही. त्याच वेळी, नित्यानंदचे फॉलोअर्स सोशल मीडियावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या देशात होत असलेल्या विकासकामांची छायाचित्रे पोस्ट करत आहेत. 

कुठे आहे कैलासा ?

नित्यानंदच्या बाबतीत सांगितले जाते की, त्यांनी एक बेटच खरेदी केले आहे. बीसीसीच्या म्हणण्यानुसार हेच बेट त्यांचा देश म्हणजेच कैलासा आहे असा दावा नित्यानंदांनी केला आहे. मात्र, नित्यानंद त्यावेळी तेथे उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे आजपर्यंत या देशाचे चित्र कुठेही दिसले नाही. उलट सोशल मीडियावर त्याचे प्रतिनिधी कैलासाबद्दल वेगवेगळ्या गोष्ट सांगत आहेत. इतकंच नाही तर जगभरातील मुत्सद्द्यांसोबत आपल्या देशाबद्दल चर्चा करणारे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत आहेत. या काल्पनिक देशाची एक वेबसाइट देखील आहे, ज्यावर कैलासाची चळवळ म्हणून वर्णन केले आहे. त्यानुसार त्याचा पाया कॅनडा आणि अमेरिकेतील हिंदू आदि शैव समाजाने घातल्याचे सांगितले आहे.

अधिक वाचा : हे अज्ञात सत्य तुम्हाला माहिती आहे का?

कशी मिळते नागरिकता ?

आता कैलासाचे नागरिकत्व कसे मिळते असा प्रश्न निर्माण होतो. गुरुवारी, युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासाने ई-नागरिकत्वासाठी लोकांकडून अर्ज मागवले आहेत.  यामध्ये त्यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे ध्वज, संविधान, आर्थिक व्यवस्था, पासपोर्ट आणि राष्ट्रीय चिन्ह देखील आहे. कैलासाच्या वेबसाइटनुसार, त्यात इतर देशांप्रमाणे ट्रेजरी , वाणिज्य, सार्वभौम, गृहनिर्माण, मानवी सेवा यासारखे विविध विभाग आहेत. कैलासा हे आंतरराष्ट्रीय हिंदू स्थलांतरितांचे घर आणि आश्रय असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कैलासाची देश म्हणून ओळख आहे का?

नित्यानंद आणि त्यांचे भक्त त्यांच्या काल्पनिक देशाचे आणि वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींच्या भेटींचे फोटो पोस्ट करत असतात. मात्र संयुक्त राष्ट्र संघाने अजूनही कैलासाला मान्यता दिलेली नाही. 1933 च्या मॉन्टेव्हिडिओ कन्व्हेन्शननुसार, एखाद्या प्रदेशाला देश म्हणायचे असेल तर त्याची कायम लोकसंख्या, सरकार आणि इतर देशांशी संबंध ठेवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

अधिक वाचा : IRCTC, PNR चा फुल फॉर्म माहितीये का?

 कैलासाची स्थिती काय आहे ?

जर एखाद्या प्रदेशाला देशाचा दर्जा मिळाला नसेल तर त्याला मायक्रोनेशन म्हणतात. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका नुसार मायक्रोनेशन, स्वतंत्र सार्वभौम राज्ये असल्याचा दावा करणाऱ्या स्वयंघोषित संस्था आहेत. पण त्यांना आंतरराष्ट्रीय समुदाय किंवा संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिली नाही. इंडिपेंडंटच्या मते, 2019 मध्ये जगात एकूण 80 मायक्रोनेशन होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी