Video: समुद्रात पडलेला फोन व्हेल माशाने परत केला, पाहा हा भन्नाट व्हिडिओ 

व्हायरल झालं जी
Updated May 10, 2019 | 11:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

थेट समुद्रात पडलेला मोबाइल चक्क एका व्हेल माशाने परत केल्याचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमका व्हिडिओ काय आहे ते तुम्हीच पाहा.

whale_returning_phone_back_to_the_girl_Instagram
VIDEO: 'स्मार्ट' माशाने समुद्रात पडलेला 'फोन' केला परत!  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: कधी-कधी प्राण्यांमध्ये माणसांपेक्षाही अधिक मानवी भावना आपल्याला दिसून येतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहेत. आता पुन्हा एकदा एक अशीच घटना घडली आहे. नॉर्वेत घडलेली एक घटना आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. नॉर्वेतील हॅमरफेस्ट हार्बरमध्ये एक ग्रुप समुदातून फेरफटका मारताना त्यातील एका महिलेचा फोन अचानक समुद्रात पडला. प्रचंड महागडा असलेला फोन अचानक समुद्रात पडल्याने त्या महिलेचा खूपच हिरमोड झाला. आपला एवढा महागडा फोन समुद्रत पडल्याने त्या परत मिळण्याचा विचारही ती महिला करत नव्हती. 

पण पुढील काही मिनिटातच जे काही झालं ते पाहून त्या बोटीतील सर्वच जण थक्क झाले. त्याचं झालं असं की, एक व्हेल मासा हा पाण्यातून थोडसा वर येताना बोटीतील सर्वांना दिसला. त्याचवेळी त्या व्हेलच्या तोंडात नुकताच पडलेला फोन असल्याचंही बोटीतील लोकांना दिसलं. व्हेल मासा देखील बोटीच्याच दिशेने येत असल्याचं यावेळी दिसलं. हा मासा जसा जवळ आला तसा त्याने तोंडात धरून ठेवलेला मोबाइल बोटीतील त्या महिलेच्या मित्राने काढून घेतला. दरम्यान या सगळ्या घटनेचं व्हिडिओ शूट देखील करण्यात आलं. जे सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. 

या घटनेचा व्हिडिओ हा आता अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, ईसा ओपडाहल ही एक महिला आपल्या मित्रांसोबत समुद्रात फिरत होती. याच वेळी मित्रांशी गप्पा-गोष्टी करत असताना ईसाचा मोबाइल थेट समुद्रातच पडला. सुरुवातीला नेमकं काय झालं हे कुणालाच कळलं नाही. पण त्यानंतर अवघ्या काही क्षणातच समुद्रात पडलेला मोबाइल हा चक्क एका माशाने परत आणून दिला होता. 

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक पांढऱ्या रंगाचा व्हेल मासा हा फोन आपल्या तोंडात दाबून बोटीच्या दिशेने येत होता. यावेळी बोटीच्या टोकाजवळच बसलेली ईसा हिला आपला फोन आश्चर्यकारकरित्या परत मिळतो. हा अतिशय सुंदर असा व्हिडिओ पाहून आपणही त्या व्हेल माशाच्या नक्कीच प्रेमात पडाल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Video: समुद्रात पडलेला फोन व्हेल माशाने परत केला, पाहा हा भन्नाट व्हिडिओ  Description: थेट समुद्रात पडलेला मोबाइल चक्क एका व्हेल माशाने परत केल्याचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमका व्हिडिओ काय आहे ते तुम्हीच पाहा.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola