पूर्व चंपारण (बिहार): तुम्ही कधीही कल्पना करू शकता की आपल्या कारमध्ये एकावेळी जेवढे लोक बसू शकत नाही तेवढे लोक एका दुचाकीवर बसून संपूर्ण बाजार फिरु शकतात. पण असं खरोखरच झालं आहे. हे फक्त आम्ही आपल्याला सांगत नाही आहोत तर तुम्हाला ते एका फोटोमधून पाहायला देखील मिळणार आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. खरं तर, बिहारमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एकाच दुचाकीवर तब्बल सात जण बसले असल्याचं दिसून येत आहे.
काय आहे प्रकरण?
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एका दुचाकीवर जवळजवळ सात लोक दिसच आहेत (एक पुरुष, एक महिला आणि पाच मुले). हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. एवढेच नाही तर या लोकांकडे बरंच सामान देखील आहे. दरम्यान, एवढ्या लोकांसह बाइक चालविणाऱ्या दुचाकीस्वाराला जेव्हा एका पोलिसाने पाहिलं तेव्हा त्याने तात्काळ दुचाकीस्वारासमोर येत त्याची बाइक थांबवली आणि थेट त्याला हातच जोडले. दरम्यान, या पोलिसाने दुचाकीस्वारला चांगलेच सुनावले देखील तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याची सूचना देखील केली. त्याचवेळी चौकात उभे असलेल्या एका युवकाने मोबाईलवरून हा फोटा काढला. जो सध्या खूपच व्हायरल होत आहे.
दुचाकीवरून निघालेल्या सात लोकांपैकी तीन मुले दुचाकीच्या पुढील भागात बसली होती. यानंतर या मुलांचे वडील आणि नंतर एक मुलगा. यानंतर आई आणि एक लहान मुल जे तिच्या मांडीच्या मागील बाजूस बसले होते. हा फोटो बिहारमधील पूर्व चंपारण येथील ढाका या गावातील आहे. हा फोटो समोर येताच अनेकांनी तो सोशल मीडियावर शेअर केला आहेत. यावरुन अनेक मिम्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत.