रात्रीच्या अंधारातच का केले जातात किन्नरांवर अंतिम संस्कार, बूट-चपलांनी का मारले जातात मृतदेहाला फटके?

व्हायरल झालं जी
Updated Jan 13, 2021 | 13:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारतात किन्नरांचे अंतिम संस्कार हे रात्रीच्या अंधारातच केले जातात. याबाबतच्या काही परंपरा आहेत ज्यांचे पालन हा समाज करतो. आम्ही आपल्याला सांगणार आहोत याच परंपरांबद्दल.

Transgender community
रात्रीच्या अंधारातच का केले जातात किन्नरांवर अंतिम संस्कार, बूट-चपलांनी का मारले जातात मृतदेहाला फटके?  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • किन्नर समुदायात शव नेताना त्याला बूट-चपलांनी मारले जाते
  • किन्नरांच्या शवांना रात्रीच्या अंधारातच दिले जातात अंत्यसंस्कार
  • काही किन्नरांना त्यांच्या मृत्यूच्या आधीच त्याचा आभास होतो अशी धारणा

घरातल्या (Home) कोणत्याही शुभकार्याच्या (auspicious occasions) वेळी किन्नर (transgender) तिथे हमखास येतात. फक्त सणवारच (festivities) नाही, तर कोणाकडे लग्न (marriage) असो, शुभकार्य असो किंवा बाळाचा जन्म (childbirth) झालेला असो, तेव्हाही किन्नर तिथे येऊन त्यांच्या पद्धतीने उत्सव साजरा (celebrations) करतात आणि दक्षिणा (money) घेऊन जातात. काही लोक ही दक्षिणा आनंदाने देतात तर काही लोक मात्र त्यांना पळवून लावतात. त्यांना आपल्या समाजात तृतीयपंथीयांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्या राहणीमानापासून ते त्यांच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतींपर्यंत सर्वच गोष्टी वेगळ्या असतात. या गोष्टींबद्दल फारच कमी जणांना माहिती असते.

काही किन्नरांना मृत्यूआधी होतो मृत्यूचा आभास

असे मानले जाते की किन्नरांकडे अध्यात्मिक शक्ती असते ज्यामुळे त्यांना आपल्या मृत्यूच्या आधीच मृत्यूची चाहूल लागते. ही चाहूल लागल्यानंतर ते बाहेर येणेजाणे, इतकेच नव्हे, तर खाणेही बंद करतात आणि फक्त पाणी पितात. यादरम्यान ते देवाकडे आपल्यासाठी आणि इतर किन्नरांसाठी प्रार्थना करतात की पुढील जन्म हा त्यांना किन्नर म्हणून मिळू नये.

मृत किन्नराच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी खास विधी

लोकांची अशीही श्रद्धा आहे की मरणोन्मुख किन्नराचा आशीर्वाद हा परिणामकारक असतो. किन्नरांचे शव जाळण्याऐवजी दफन केले जाते. मृत्यूनंतर सर्वात आधी त्याच्या आत्म्याला मुक्त करण्याची प्रक्रिया केली जाते. यासाठी त्याचे शव पांढऱ्या कापडात गुंडाळले जाते. शवावर काहीही गुंडाळलेले असू नये याचीही दक्षता घेतली जाते जेणेकरून मृताचा आत्मा मुक्त होऊ शकेल.

यासाठी रात्रीच्या अंधारात केला जातो अंत्यसंस्कार

मृत किन्नराच्या शरीरावर रात्रीच्या वेळीच अंत्यसंस्कार केले जातात यामागे असा प्रयत्न असतो की त्यांना त्यांच्या समुदायाच्या बाहेरच्या कोणी पाहू नये. यामागे अशीही एक धारणा आहे की एखाद्या गैरकिन्नर व्यक्तीने किन्नराचे शव पाहिले तर मृत किन्नराला पुढचा जन्म हा पुन्हा किन्नर म्हणूनच मिळतो. त्यामुळे त्याच्या मुक्तीसाठीच ही शवयात्रा रात्रीच्या वेळी काढली जाते.

मृत्यूनंतर साजरा केला जातो आनंद

किन्नर समुदायात शवयात्रा काढण्याआधी मृतदेहाला बूट-चपलांनी फटके मारले जातात. सर्व किन्नर मृतदेहाजवळ उभे राहून त्यांच्या आराध्यदैवताचे आभार मानतात आणि पुन्हा किन्नर म्हणून जन्म मिळू नये म्हणून प्रार्थना करतात. याशिवाय दानधर्मही केला जातो. किन्नर समाजात एखाद्याच्या मृत्यूनंतर आनंद साजरा करण्याची पद्धत आहे की या नरकासमान आयुष्यातून त्याला मुक्ती मिळाली. असेही म्हटले जाते की या अंत्यसंस्कारांनंतर एक आठवडाभर किन्नर समुदाय उपाशीच राहतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी