Husband Wife Viral Video कधी कधी रस्त्यावरून चालताना असे काही दिसते, की ते पाहून हसू फुटते. या व्हिडिओमध्येदेखील असेच काही तरी खास आहे. चला तर मग जाणून घेऊया या व्हीडियोची संपूर्ण माहिती, ज्यात असे काय खास आहे, जे तुम्हाला पाहण्यास भाग पाडेल. Wife helps Husband to smoke while riding bike video goes viral on internet
प्रथमदर्शनी हा व्हिडिओ नवरा बायकोचा असून हे कुटुंबीय कुठेतरी जात आहेत, असे दिसते आहे. पण हा काही सामान्य व्हिडियो नाही बरं का!
अधिक वाचा : 70 वर्षांनंतर देशात चित्ताचा जन्म, कुनोत कुस उजवली
यात पतीच्या बाईकवर मागे पत्नी बसली आहे आणि तिचा पती बाईक चालवत आहे, आता या व्हिडिओची खरी गोष्ट सुरू होते, पत्नी चालत्या बाईकवर पतीला सिगारेट पाजताना दिसत आहे. म्हणजे पती बाईक चालवताना स्मोकिंगचा देखील आनंद लुटत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून, जो पाहून तुम्ही देखील म्हणाल 'बायको असावी तर अशी".
अधिक वाचा : जितेंद्र आव्हाड यांच्या पोलीस बॉडीगार्डची आत्महत्या
इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ (Instagram Viral Video) पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ जितका मजेशीर आहे, तितकेच मजेशीर त्यावर आलेल्या कमेंट्स देखीलआहेत. या व्हीडियोच्या खाली एका नेटकऱ्याने कमेंट केली,की "मी अशीच एक मुलगी शोधत आहे" तर, एकाने कमेंटमध्ये 'बहुतेक, बायकोने जीवन विमाचे पेपर पाहिले असावेत' अशी खिल्ली उडवली आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत आणि हजारवेळा हा व्हिडिओ शेअर देखील करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 'sunnobc' नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.