[Video] फूल स्पीडने समोरून येत होता 'मृत्यू', बेशुद्ध होऊन रेल्वे रुळावर पडली महिला, पण अशी दिली नशिबाने साथ 

व्हायरल झालं जी
Updated Oct 18, 2019 | 15:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Video: वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर अचानक एक महिला बेशुद्ध होऊन पडली पण नशिबाने तिची साथ दिली आणि तिचे प्राण जाता जाता वाचले. पाहा व्हायरल व्हिडिओ... 

woman cheats death after she fell down on rail tracks in front of coming speedy train viral news in marathi google batmya
[Video] फूल स्पीडने समोरून येत होता 'मृत्यू', बेशुद्ध होऊन रेल्वे रुळावर पडली महिला, पण अशी दिली नशिबाने साथ   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 
  • रेल्वे ट्रॅकवर पडलेल्यानंतर समोरून वेगाने येणाऱ्या मृत्यूला दिली महिलेने मात 
  • वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर बेशुद्ध होऊन पडली महिला
  • पण नशिबाने दिली साथ आणि अशी वाचली महिला 

ब्युनर्स आयर्स : एक महिलेने मृत्यूला चकवा दिल्याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. सोशल मीडियावर एक अत्यंत अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या महिलेचे अचानक संतुलन बिघडते आणि ती बेशुद्ध होऊन प्लॅटफॉर्मवरून रुळावर कोसळते. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ती जेव्हा रुळावर कोसळते तेव्हा त्याच ट्रॅकवरून एक रेल्वे येत असते. 

हा प्रकार भारतातील नाही तर अर्जंटीनातील ब्युनर्स आयर्स येथील आहे. रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. अत्यंत नाटकीय पद्धतीने सर्व घटना घडली आणि तिचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होत आहे. व्हिडिओ फुटेज नुसार एक महिला प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर पायी जात होती. अचानक तिचे संतुलन बिघडते आणि ती बेशुद्ध होऊन प्लॅटफॉर्मवर पडते. दुर्दैवाने येणाऱ्या जाणाऱ्यांचा धक्का लागतो आणि ती रेल्वे ट्रॅकमध्ये पडते. महिला संपूर्ण बेशुद्ध होते. त्याचवेळी त्या ट्रॅकवरून एक ट्रेन भरधाव वेगाने येते. हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे. 

पाहा घटनेचा थरारक व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की प्लॅटफॉर्मवर उभे असलेले नागरिक वेगाने येणारी ट्रेन थांबविण्याच प्रयत्न करतात. हात हलवून ते ट्रेन थांबविण्याचा प्रयत्न करतात. सुदैवाने काही पावलांच्या अंतरावर ही ट्रेन थांबविण्यात मोटरमनला यश येते. त्यामुळे या महिलेचे प्राण वाचतात. काही लोक रुळावर उतरून त्या महिलेला सुरक्षित प्लॅटफॉर्मवर आणतात. 

ही घटना ब्युनर्स आयर्स येथील पॅरेडन मेट्रो स्टेशन येथील आहे. व्हिडिओ पाहू शकतो की पोलीस आणि मेडीकल टीम त्या महिलेला मदत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आता पर्यंत २३ हजार पेक्षा अधिका लोकांना सोशल मीडियावर पाहिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी