अबब! ज्यानं घेतला मुलीचा चावा त्यालाच घेऊन हॉस्पिटलला पोहोचली महिला

व्हायरल झालं जी
Updated Jul 09, 2019 | 14:31 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

मुंबईतील एक धक्कादायक घटना पुढे आलीय. इथं एक महिला चक्क आपल्या मुलीला चावलेल्या सापाला सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. जाणून घ्या या संपूर्ण प्रकरणाबाबत...

Sneck
चावा घेणाऱ्या सापाला घेऊन महिला पोहोचली हॉस्पिटलमध्ये  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • मुलीला चावणाऱ्या सापाला घेऊन महिला पोहोचली हॉस्पिटलमध्ये
  • डॉक्टरांना योग्य उपचार करता यावा म्हणून महिलेनं उचललं हे पाऊल
  • महिला आणि मुलीला डॉक्टरांनी दिले योग्य इंजेक्शन, सापाला सोडलं जंगलात

मुंबई: शहरातील एक आश्चर्यकारक तेवढीच धक्कादायक घटना समोर आलीय. धारावी डेपो इथल्या सोनेरी चाळीत राहणाऱ्या महिलेनं आपल्या मुलीला दंश करणाऱ्या जिवंत सापाला सोबत घेऊन चक्क हॉस्पिटल गाठलं. महिला आपल्या मुलीसोबत सापाला घेऊन दवाखान्यात पोहोचली. ते बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

महिलेचं हे वागणं बघून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले. साप चावलेल्या मुलीला घेऊन महिला सायन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. डॉक्टरांनी महिलेला याबाबत विचारलं असता तिनं सांगितलं की, डॉक्टरांना योग्य अँटी-वेनम म्हणजेच विषरोधी इंजेक्शन शोधण्यात मदत व्हावी म्हणून आपण असं केल्याचे महिलेने स्पष्ट केले. 

महिलेनं सांगितलं की, तिच्या एका नातेवाईकाला जेव्हा साप चावला होता. तेव्हा त्यावेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की, सापाची योग्य ओळख झाली तर त्यावर उपचार करणं, योग्य अँटी-वेनम निवडण्यात मदत होते.

महिलेनं पुढे सांगितलं, जेव्हा ती आपल्या कुटुंबियांसोबत नाश्ता करत होती. तेव्हा तिच्या मुलीला साप चावला, ते बघून घरातील सर्व घाबरून गेले. तेव्हा सुल्तानानं लगेच सापाला खेचलं तेव्हा सापानं त्यांनाही चावा घेतला. त्यामुळे आई-मुलगी दोघीही साप चावल्यानं जखमी झाल्या. हे बघून महिलेनं लगेच सापाला धरलं आणि मुलीला घेऊन हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी सापाला पाहून असं करण्याची गरज नव्हती, ते जोखीमीचं आहे हे स्पष्ट केलं.

सापाची जात न बघताही त्यावर उपचार केले जावू शकतात, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. साप कुठल्याही जातीचा असला तरी त्यावर उपचार करण्याची पद्धत ही एकच असते, असं डॉक्टरांनी त्या महिलेला सांगितलं.

सुल्ताना यांनी सांगितलं की, साप चावल्यामुळे त्यांची मुलगी तहसीन हिचा हात खूप सुजलेला होता. तर सुल्ताना यांचाही दुसरा हात एकदम सुन्न झाला होता. डॉक्टरांनी जेव्हा तिच्या मुलीवर उपचार केला, तेव्हा तिला दोन वेळा उलट्याही झाल्या, असं सुल्ताना सांगते.

डॉक्टरांनी सांगितलं की, युनिव्हर्सल अँटी-स्नेक वेनम इंजेक्शन जे सर्वप्रकारच्या सर्पदंशावर उपयुक्त ठरतं. डॉक्टरांनी आई-मुलीवर उपचार केला आणि सापाच्या विषाचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांना चार-चार इंजेक्शन दिले. घटनेनंतर डॉक्टरांनी वन अधिकाऱ्यांना पाचारण करून साप त्यांच्या स्वाधीन केला. वन अधिकाऱ्यांनी सापाला जंगलात सोडून दिलं आणि सापामुळे पुन्हा कुणाला यापासून धोका निर्माण झाला नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अबब! ज्यानं घेतला मुलीचा चावा त्यालाच घेऊन हॉस्पिटलला पोहोचली महिला Description: मुंबईतील एक धक्कादायक घटना पुढे आलीय. इथं एक महिला चक्क आपल्या मुलीला चावलेल्या सापाला सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. जाणून घ्या या संपूर्ण प्रकरणाबाबत...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola