न्यू यॉर्क : अमेरिकेतल्या पंजाबी जोडप्याच्या घरात राहण्यासाठी आलेली त्यांची मैत्रिण आता कायमची त्या घरातील सदस्य बनली आहे. वास्तविक, ही महिला घटस्फोटाच्या घटनेनंतर आपल्या मैत्रिणीकडे भावनिक आधारासाठी काही दिवस राहिली होती, परंतु, आता तिघांमधील बॉन्डिंग अशी बनली की तिघेही आता गेल्या कित्येक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
अमेरिकेच्या इंडियानापोलिसमध्ये राहणार्या सनी आणि स्पीती यांचे 2003 साली लग्न झाले. सनीचा जन्म पंजाबमध्ये झाला असून वयाच्या आठव्या वर्षी तो न्यूयॉर्कला आला होता. यानंतर जेव्हा तो भारतात आला तेव्हा त्याची स्पीतीची गाठ पडली आणि काही काळानंतर दोघांचे लग्न झाले.
स्पीती तिची मैत्रिणी पिद्दू कौरच्या अरेंज मॅरेजमध्ये सामील झाली होती. तथापि, कौरचे लग्न काही महिने टिकले. खरं तर, कौरच्या नवऱ्याने लग्न यासाठी केले की तिच्या पालकांनी सांगितले की लग्नानंतर आपल्याला एक नवीन कार देतील. सततची भांडण यामुळे कंटाळून कॅलिफोर्नियामधील नवऱ्याचे घर सोडून कौर ही सनी आणि स्पीती यांच्याबरोबर राहण्यासाठी न्यूयॉर्कला गेली.
या नात्यात अडकल्यानंतर स्पितीला बर्याच वर्षांपर्यंत असेही वाटले होते की तिचा नवरा मैत्रिणीमुळे तिला सोडून तर देणार नाही. तिच्या या अस्वस्थतेमुळे आणि भीतीमुळे तिघांनी काही नियम बनवले. या नियमांनुसार तिघांमध्ये कोणतेही रहस्य राहणार नाही आणि दोन व्यक्ती कधीही स्वतंत्र डेट्सला जाणार नाहीत. स्पीती म्हणाली की कौर जेव्हा आमच्या आयुष्यात आली तेव्हा ती घटस्फोटाच्या काळातून जात होती. आम्ही एकमेकांना ऐकायचो, एकमेकांशी इमोशनल व्हायचो आणि एकमेकांसोबत डान्सही करायचो. हे आकर्षण फक्त भावनिक नव्हते तर सनीसुद्धा या निर्णयामुळे खुश होता.
या नात्यापूर्वी सनी आणि स्पीती यांना दोन मुली होत्या, ज्या 16 आणि 15 वर्षांच्या होत्या आणि आता स्पितीने तिच्या तिसऱ्या मुलीला जन्म दिला आहे, ती 9 वर्षाची आहे. याशिवाय कौरने 4 वर्षाच्या मुलालाही जन्म दिला आहे. या तिघांचे कुटुंब पारंपारिक भारतीय पार्श्वभूमीचे असल्याने या लोकांना या कुटुंबातील काही सदस्यांशी संबंध तोडावे लागले. घरातील लोकांना या तिघांचे नाते समजू शकले नाही.