पत्नी चवीने खाते पतीची राख

Woman eats her dead husband's ashes इंग्लंडमध्ये एक २६ वर्षांची महिला मागील दोन महिन्यांपासून नियमितपणे पतीची राख चवीने खात आहे. केसी असे या महिलेचे नाव आहे.

Woman eats her dead husband's ashes
पत्नी चवीने खाते पतीची राख 
थोडं पण कामाचं
  • पत्नी चवीने खाते पतीची राख
  • २६ वर्षांची महिला मागील दोन महिन्यांपासून नियमितपणे पतीची राख चवीने खात आहे
  • महिलेने 'माय स्ट्रेंज अॅडिक्शन' या कार्यक्रमात माहिती दिली

लंडन: इंग्लंडमध्ये एक २६ वर्षांची महिला मागील दोन महिन्यांपासून नियमितपणे पतीची राख चवीने खात आहे. केसी असे या महिलेचे नाव आहे. Woman eats her dead husband's ashes

केसी आणि शॉन यांनी २००९ मध्ये लग्न केले. अस्थमाचा अॅटॅक आल्यामुळे शॉनचा मृत्यू झाला. अग्नी देऊन शॉनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पतीच्या आकस्मिक निधनाचा मानसिक धक्का बसल्यामुळे केसीने शॉनच्या पार्थिवाची अंत्यसंस्कारानंतर उरलेली राख गोळा केली. ही राख तिने स्वतःसोबत घरी नेली. यानंतर केसी घराबाहेर पडताना प्रत्येकवेळी स्वतःसोबत शॉनची राख घेऊन फिरू लागली. या पद्धतीने आपण जिथे फिरतो तिथे शॉन आपल्यासोबत असतो, असे समजून ती आनंदात राहू लागली.

सोबत राख घेऊन फिरण्याच्या केसीच्या वर्तनाकडे ओळखीतल्यांनी दुर्लक्ष केले. ती हळू हळू सावरेल असा विचार ते करत होते.... आपल्याकडे कोणी बघत नाही यामुळे आता शॉनची राख हीच आपल्या सोबत राहणार मग ती स्वतःमध्येच मिसळवून टाकली तर... असा विचार केसी करू लागली. हा विचार करता करता नकळतपणे राखेला हाताच्या बोटांनी स्पर्श करण्याची आणि नंतर बोटांना लागलेली राख चाखून खाण्याची केसीला सवय लागली. 

राख खाण्याची सवय लागली त्याला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला तरी केसीची सवय मोडलेली नाही. ती नियमितपणे अत्यल्प स्वरुपात राख चाखत आहे. केसीने राख चाखण्याच्या तिच्या सवयीबाबत टीएलसी चॅनलवरील 'माय स्ट्रेंज अॅडिक्शन' या कार्यक्रमात माहिती दिली. राख चाखली की शरीरात उत्साह संचारतो, असे केसीने सांगितले.

राख चाखण्याची सवय लागल्यापासून माझे जेवण कमी झाले आहे. मला राख चाखणे जास्त आवडू लागले आहे. यामुळे दोन महिन्यांत माझ्या वजनात १९ किलोंची घट झाली. पण माझी राख चाखण्याची सवय कायम आहे, असे केसी म्हणाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी