बॉस रागावल्यामुळे नाराज झालेली युवती आत्महत्या करण्यासाठी मेट्रो स्थानकाच्या छतावर चढली

व्हायरल झालं जी
Updated Jul 25, 2021 | 12:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिल्लीजवळच्या फरिदाबाद इथे एक युवती आपल्या बॉसकडून मिळालेल्या दटावणीमुळे इतकी नाराज झाली की तिने आत्महत्या करण्याचे ठरवले. युवती आत्महत्या करण्यासाठी मेट्रो स्थानकाच्या छतावर चढली. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Suicide attempt
बॉस रागावल्यामुळे नाराज झालेली युवती आत्महत्या करण्यासाठी मेट्रो स्थानकाच्या छतावर चढली 

थोडं पण कामाचं

  • फरिदाबाद इथे एका युवतीचा मेट्रो स्थानकावर हंगामा
  • आत्महत्या करण्यासाठी युवती चढली मेट्रो स्थानकाच्या छतावर
  • पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव

फरिदाबाद: फरिदाबादच्या (Faridabad) सेक्टर 28च्या मेट्रो स्थानकावर (metro station) शनिवारी संध्याकाळी एका युवतीने (woman) मोठाच गोंधळ (havoc) घातला ज्यामुळे स्थानकाच्या खालच्या वाहतुकीवरही (traffic) परिणाम (affected) झाला. ही युवती मेट्रो स्थानकाच्या छतावर (roof) चढली आणि आत्महत्या (suicide) करण्याची धमकी (threat) देऊ लागली. यादरम्यान स्थानकावर गर्दी (mob) जमा झाली आणि लोक व्हिडिओ (video) बनवू लागले. मेट्रोच्या सुरक्षेसाठी (security) तैनात असलेल्या सीआयएसएफ (CISF) आणि फरिदाबाद पोलिसांनी (police) युवतीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकले नाही. मात्र यांनी प्रसंगावधान राखून तिला वाचवले.

बॉस ओरडल्यामुळे नाराज होती युवती

हाती आलेल्या माहितीनुसार ही युवती एका कारखान्यात काम करत होती आणि तिथे आपल्या बॉससोबत तिचा काही कारणांनी वाद झाला. यानंतर बॉसने तिला दटावले. यामुळे ती भडकली आणि तणावाच्या मनःस्थितीत मेट्रो स्थानकाकडे चालू लागली. इथे सेक्टर 28च्या मेट्रो स्थानकावर पोहोचून ती थेट फलाटावर गेली आणि आत्महत्या करण्यासाठी छतावर चढली.

युवतीच्या वागण्याचा वाहतुकीवर झाला परिणाम

ही युवती मेट्रो स्थानकाच्या छतावर चढलेली पाहताच लोक आपापली वाहने थांबवून तिचा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू लागले. यामुळे मेट्रो स्थानकाच्या खालच्या भागातल्या वाहतुकीवर या गोंधळाचा परिणाम झाला. या वेळात मेट्रोच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना घडल्या प्रकाराची माहिती मिळाली आणि ते तिथे पोहोचले. एका पोलीस कर्मचाऱ्याने छतावर चढून तिला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि ओढून आत घेतले.

पोलिसांनी प्रकरणाच्या चौकशीला केली सुरुवात

23 वर्षाची ही युवती नांगलोईची रहिवासी आहे जी फरिदाबादमध्ये एका एक्सपोर्ट हाऊसमध्ये काम करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्यात तपासणीदरम्यान एक सँपल नापास करण्यात आले ज्यामुळे या युवतीला बॉसने दटावले. ज्याचा तिच्यावर परिणाम झाला. यानंतर लगेचच कारखान्याच्या अधिकाऱ्यांना बोलावले गेले आणि त्यांची चौकशी झाली. या युवतीचीही चौकशी केली गेली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी