Woman Gave Birth To Baby Girl And Won Lottery Of 80 Lakh Rupees, Lucky Charm Girl : मुलगी जन्माला आली म्हणजे घरात लक्ष्मी आली असे म्हणतात. हा विचार एका महिलेच्या बाबतीत तंतोतंत खरा ठरल्याचे दिसून आले. सकाळी महिलेने एका मुलीला जन्म दिला. संध्याकाळी महिलेने काही दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या लॉटरीचा निकाल जाहीर झाला. यात संबंधित महिलेला 80 लाख रुपयांचे बक्षिस लागले. मुलीच्या जन्मानंतर 24 तासांच्या आत तिच्या आईला 80 लाख रुपयांचे बक्षिस लागले. एकाच दिवसात दोन चांगल्या घटना घडल्यामुळे मुलीच्या मातेने आनंद व्यक्त केला. माझ्यासाठी माझी मुलगी म्हणजे लकी चार्म आहे, असे संबंधित महिलेने सांगितले.
ही घटना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये घडली. नॉर्थ कॅरोलिनामध्ये 28 वर्षांच्या ब्रेंडा हिने 9 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी एका मुलीला जन्म दिला. त्याच दिवशी संध्याकाळी तिला लॉटरी लागली. तिला बक्षीस म्हणून 80 हजार पौंडांचे बक्षिस लागले. या बक्षिसाचे मूल्य भारतीय चलनात रुपांतरीत केल्यावर 80 लाख रुपयांच्या घरात जाते. टॅक्स कापून ब्रेंडाला सुमारे 53 लाख लाख रुपये मिळाले. ही रक्कम ब्रेंडाच्या बँक खात्यात 30 नोव्हेंबर 2022 रोजी जमा झाली.
Necklace theft: गॉगल आणि मास्क लावलेल्या महिलेने सराईतपणे चोरला 10 लाखांचा हार, पाहा व्हिडिओ
ब्रेंडाची कहाणी 'द मिरर'ने प्रसिद्ध केली. ही कहाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या जमान्यात वेगाने व्हायरल झाली. मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करत असलेल्या ब्रेंडाला लॉटरीचा रिझल्ट संध्याकाळी समजला. यामुळे तिला प्रचंड आनंद झाला. जन्माला आलेल्या चिमुकलीने माझे नशीब बदलले. मी तिची आभारी आहे. ती माझ्यासाठी लकी चार्म आहे, असे ब्रेंडा म्हणाली.
याआधी यूएस पॉवरबॉल लॉटरी ड्रॉ जाहीर होताच ब्रेंडा आनंदाने उड्या मारू लागली. बक्षिसाची माहिती ब्रेंडाला लॉटरी कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली. ही आनंदाची बातमी ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले. सकाळी मुलगी झाली आणि संध्याकाळी मी लॉटरी जिंकली. या दोन आनंददायी घटनांमुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे ब्रेंडाने सांगितले.
मुलीच्या जन्मामुळे ब्रेंडा 3 मुलांची आई झाली. याआधी ब्रेंडाने 2 मुलांचे संगोपन करत असताना कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज काढले होते. लॉटरीतून मिळालेल्या पैशांतून ती या कर्जाची परतफेड करणार आहे. कर्जाच्या विळख्यातून सुटल्यानंतर तिन्ही मुलांची काळजी निवांतपणे घेणार असल्याचे सूतोवाच ब्रेंडाने केले.
मी ठराविक दिवसांच्या अंतराने नियमित लॉटरी काढत होते. पण मुलीच्या जन्मानंतर मला पहिल्यांदा लॉटरीचे बक्षिस मिळाल्याचे ब्रेंडा म्हणाली.