वारंवार जुळ्यांना जन्म देणाऱ्या मातेच्या बाबतीत घडली अनपेक्षित घटना

Offbeat News, Ajab Gajab News : सलग पाच वेळा जुळ्यांना जन्म देणाऱ्या मातेच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडली.

Woman Give Birth Twins For Fifth Time Husband Left Her Know About Truth
वारंवार जुळ्यांना जन्म देणाऱ्या मातेच्या बाबतीत घडली अनपेक्षित घटना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • वारंवार जुळ्यांना जन्म देणाऱ्या मातेच्या बाबतीत घडली अनपेक्षित घटना
  • घटना आफ्रिकेतील युगांडा या देशात घडली
  • पत्नीने सलग पाच वेळा जुळ्यांना जन्म दिला आणि पती घर सोडून गेला

Offbeat News, Ajab Gajab News : सलग पाच वेळा जुळ्यांना जन्म देणाऱ्या मातेच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडली. ही घटना आफ्रिकेतील युगांडा या देशात घडली. पत्नीने सलग पाच वेळा जुळ्यांना जन्म दिल्यामुळे दहा मुले आणि पती-पत्नी असे बारा जणांचे कुटुंब झाले. एवढे मोठे कुटुंब चालवणे आर्थिकदृष्ट्या कठीण वाटू लागल्यामुळे पतीने घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. महिलेने ज्यांना जन्म दिला त्या दहा मुलांपैकी मोठी मुले पण महिलेला सोडून निघून गेली. यामुळे नोकरी न करणाऱ्या महिलेसमोर अचानक तिच्या लहान मुलांचे संगोपन करण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.

Viral Video : पतीच्या मोबाईलमध्ये वाजला अलार्म, पत्नीने ‘असं’ झोपवलं की पुन्हा उठलाच नाही

चरितार्थ चालविण्याचे आव्हान झाले निर्माण

महिला पती आणि मुलांसह भाडेपट्टीवर राहात होती. पण पती घर सोडून गेल्यामुळे महिलेला घराचे भाडे भरणे कठीण झाले आहे. घर मालकाने महिलेला भाडे भरा किंवा घर रिकामे करा असा इशारा दिला आहे. यामुळे महिलेसमोर लहान मुलांसह कुठे राहावे आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी पैसा कुठून आणावा असा प्रश्न आहे. 

Optical Illusion: या फोटोत आहेत दोन Tiger, १५ सेकंदात पूर्ण करून दाखवा चॅलेंज

नलोंगो ग्‍लोरिया हिचा प्रश्न

महिलेचे नाव नलोंगो ग्‍लोरिया आहे. पती आणि मोठी मुले घर सोडून निघून गेल्यामुळे आता चरितार्थ चालविणे नलोंगो ग्‍लोरिया हिच्यासाठी कठीण झाले आहे. माझ्या पोटी सलग पाच वेळा जुळी मुले जन्माला आली म्हणून मला दोषी कसे म्हणता येईल, असा प्रश्न नलोंगो ग्‍लोरिया विचारत आहे. अचानक निर्माण झालेला चरितार्थ चालविण्याचा प्रश्न सोडवावा कसा हे समजत नसल्याचे नलोंगो ग्‍लोरियाने सांगितले. 

VIRAL VIDEO: गाईसमोर 'मार डाला' गाण्यावर थिरकली अन् मग गाईने तिची चांगलीच जिरवली, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी