पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 5 दिवसांनी महिलेने दिला जुळ्या बाळांना जन्म

व्हायरल झालं जी
Updated May 27, 2021 | 14:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ. वॉशिंग्टनमधल्या एका महिलेने पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर फक्त 5 दिवसांनी जुळ्या बाळांना जन्म दिला. या जुळ्यांच्या जन्मानंतर तिने एक विश्वविक्रमही स्थापन केला.

Baby and mother
पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 5 दिवसांनी महिलेने दिला जुळ्या बाळांना जन्म  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • 5 दिवसांच्या अंतराने झाला तिळ्यांचा जन्म
  • आकाराने आणि वजनाने लहान होते पहिले बाळ
  • 4 महिने आयसीयूमध्ये होती तिन्ही बाळे

वॉशिंग्टन: आई होणे (Motherhood) हा स्त्रीच्या (woman) आयुष्यातला (life) महत्त्वाचा काळ (important period). वॉशिंग्टनमधल्या (Washington) एका महिलेने पहिल्या बाळाला (first baby) जन्म (birth) दिल्यानंतर फक्त 5 दिवसांनी जुळ्या बाळांना (twin babies) जन्म दिला. या जुळ्यांच्या जन्मानंतर तिने एक विश्वविक्रमही (world record) स्थापन केला आहे. एकाच वेळी जुळी (twins) किंवा तिळी (triplets) बाळे झाल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. मात्र काही दिवसांच्या अंतराने (gap) त्यांचा जन्म होणे ही घटना मात्र असामान्य (uncommon) आहे.

5 दिवसांच्या अंतराने झाला तिळ्यांचा जन्म

या महिलेच्या गर्भात तिळी बाळं होती. मात्र त्या तिघांचा जन्म एकाच वेळी झाला नाही. या महिलेने आधी एका बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर 5 दिवसांच्या अंतराने जुळ्या बाळांना जन्म दिला. न्यूयॉर्कमधल्या 33 वर्षीय कायली डेशनने 28 डिसेंबर 2019 रोजी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. तर 5 दिवसांनी, म्हणजेच 2 जानेवारी 2020 रोजी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. सर्वात कमी अंतराने दोन वेळा प्रसूत होणाचा विश्वविक्रम कायलीने मोडला आहे. वर्षानुसार पाहायचे झाले तर या बाळांच्या जन्मात एका दशकाचे अंतर आहे.

आकाराने आणि वजनाने लहान होते पहिले बाळ

डेली मेलच्या बातमीनुसार कायलीला गर्भावस्थेच्या 22व्या आठवड्यात प्रसुतीवेदना सुरू झाल्या. रुग्णालयात तिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. हे बाळ फारच लहान होते. त्याचे वजन फक्त 454 ग्रॅम होते. कायलीच्या गर्भात अद्याप जुळी होती. त्यांच्या जन्मासाठी ती रुग्णालयातच थांबली. मात्र डॉक्टरांनी त्यांच्या जन्माला अद्याप अवकाश असल्याचे सांगितले. त्यामुळे ती घरी परतली, मात्र पाचच दिवसांनी तिला पुन्हा प्रसूतीवेदना होऊ लागल्या आणि तिने जुळ्यांना जन्म दिला.

4 महिने आयसीयूमध्ये होती तिन्ही बाळे

या तिन्ही बाळांची परिस्थिती बरीच गंभीर होती आणि त्यांच्या जगण्याची शक्यता कमी होती. या तिन्ही भावंडांना चार महिने आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यापैकी दोन मुले आणि एक मुलगी आहे. घरी आल्यानंतरही काही काळ ही तिन्ही मुले ऑक्सिजन सपोर्टवर होती. त्यांची नावे डेक्लान, रोवन आणि सियान अशी आहेत. आता त्यांचे वय 17 महिन्यांचे आहे आणि त्यांची तब्येत आता एकदम ठणठणीत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी