'फ्री इंटर्नवेअर' देण्याचा बहाण्याने महिलेला गंडवले, त्यानंतर न्यूड फोटोंची केली मागणी 

महिला ग्राहकाला 'फ्री इंटर्नवेअर' देण्याचे आमिष देऊन प्रथम तिचे फोटो मागविले.  आणि त्यानंतर तिचे नग्न फोटो पाठविण्यास सांगितले. तसे न केल्याने त्याने फोटोत छेडछाड करुन इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली.

woman lured on pretext of free innerwear man booked for harassing her in amhmadabad
'फ्री इंटर्नवेअर' देण्याचा बहाण्याने महिलेला गंडवले,आणि  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • महिला ग्राहकाला 'फ्री इंटर्नवेअर' देण्याचे आमिष देऊन प्रथम तिचे फोटो मागविले.
  • त्यानंतर तिचे नग्न फोटो पाठविण्यास सांगितले.
  • तसे न केल्याने त्याने फोटोत छेडछाड करुन इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली.

अहमदाबाद :  गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे.   येथील एका व्यक्तीने प्रथम 'फ्री इंटर्नवेअर' चे महिलेला आमिष दाखवले आणि त्यानंतर तिच्याकडून नग्न छायाचित्रांची मागणी करण्यास सुरवात केली. त्याने या महिलेला धमकावले की, असे न केल्यास तो तिच्या फोटोंमध्ये छेडछाड करुन ते इंटरनेटवर अपलोड करेल. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्ययानंतर पोलिसांनी  गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पीडित महिलेला 3 डिसेंबर 2020 रोजी तिच्या मोबाइल फोनवर एक प्रमोशनल  टेक्स मेसेज आला.  यात ग्राहकांसाठी 'फ्री इंटर्नवेअर' मिळणार असा  मजकूर असलेला मेसेज मिळाला. त्या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून त्या महिलेने तपशील लिहून घेतला. सुमारे दोन आठवड्यांनंतर, 17 डिसेंबर रोजी, त्या महिलेला दुसरा संदेश आला, ज्याने तिला आपला फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यास सांगितले. या महिलेने आपले छायाचित्र देखील पाठविले, त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

महिलेकडे मागितलेले न्यूड फोटो

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत या महिलेने सांगितले, की तिने आपले छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवताच तिला अज्ञात व्यक्तीकडून आणखी एक मजकूर संदेश मिळाला, ज्यामध्ये तिने नग्न फोटो पाठविण्यास सांगितले. जेव्हा महिलेने नकार दिला तर त्याने तिला धमकावले. मेसेजमध्ये जेव्हा त्याने अपशब्दांचा वापर केला, तसेच त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेल्या फोटोमध्ये छेडछाड करुन इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकीही दिली.

आरोपी व्यक्तीनेही काही दिवस महिलाचा पाठलाग सुरू ठेवला, त्यानंतर महिलेने पोलिसांशी संपर्क साधला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी