ऐकावे ते नवलच: घटस्फोट झाल्याने महिलेने ठेवली पार्टी अन् वेटरवरच झाली फिदा आणि मग...

घटस्फोट झाल्याने एका महिलेने पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र, याच पार्टीमध्ये असं काही घडलं की, तिने लग्नगाठच बांधली आहे. 

woman organise party after divorce and fall in love with waiter in same occation
(Photo: Social Media) 
थोडं पण कामाचं
  • घटस्फोट झाल्याने सेलिब्रेशनसाठी महिलेने ठेवली पार्टी
  • पार्टीतील वेटरवरच महिला झाली फिदा
  • ऑस्ट्रेलियात घडली ही घटना

Trending ajab gajab: जगात अशा अनेक घटना घडत असतात ज्या ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो. कोणाच्या आयुष्यात कधी, कुठे आणि काय घडेल याचा अंदाजच बांधता येत नाही. आपल्या आयुष्यात जोडीदारापासून कधी कोण वेगळं होईल आणि कधी कुणाची जोडी जमेल याबाबत काहीच सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे. (woman organise party after divorce and fall in love with waiter in same occasion)

एका महिलेने आपल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानतंर या महिलेनेच चक्क एका पार्टीचं आयोजन केलं. पतीपासून वेगळी झाल्याने ही महिला पार्टी करत होती. पण त्याच पार्टीत असं काही घडलं की, काही मिनिटांतच त्या महिलेचं आयुष्यच बदलून गेलं.

अधिक वाचा : Great citizens : ट्रकमधून रस्त्यावर पडल्या बिअरच्या हजारो बाटल्या, नागरिकांनी केलं अभिमानास्पद काम, पाहा VIDEO

ही विचित्र घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे. येथील गॅब्रिएला लँड़ल्फी नावाच्या महिलेच्या आयुष्यात एक वेगळीच घटना घडली आहे. ज्याच्या संदर्भात तिने कधी विचारही केला नसेल. गॅब्रिएला हिने आपल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. घटस्फोटाचा आनंद साजरा करण्यासाठी तिने पार्टी आयोजित केली. याच पार्टीत तिला आपला नवा जोडीदार मिळाला.

अधिक वाचा : Optical Illusion: समुद्रामध्ये लपली आहे मगर, १० सेकंदात दाखवा शोधून, भले भलेही झाले फेल

पार्टी ज्या ठिकाणी आयोजित केली होती तेथील वेटरवरच ही महिला फिदा झाली आणि त्याच्या प्रेमात पडली. पार्टीत जॉन नावाचा एक वेटर होता. या वेटरवर ती महिला फिदा झाली. पार्टी संपल्यावर दुसऱ्या दिवशी जॉन याने या महिलेच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर दोघांमध्ये हळूहळू संभाषण सुरू झाले आणि त्यांच्यातील जवळीक वाढत केली. त्यानंतर दोघांनी एक वर्ष एकमेकांना डेट केलं. यानंतर जॉनने गॅब्रिएलाला प्रपोज केलं.

ऐकायला विचित्र वाटेल पण असं खरोखर घडलं आहे. हे ऐकूण अनेकांना आश्चर्य वाटते. काहींनी म्हटलं की, ही महिला नशिबवान निघाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी