अहो आश्चर्यम्! ११ मुले असलेल्या ३८ वर्षीय महिलेचं होणार २०व्यांदा बाळंतपण

व्हायरल झालं जी
Updated Sep 09, 2019 | 22:39 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एका महिलेचं २०व्यांदा बाळंतपण होणार आहे. या ३८ वर्षीय महिलेला ११ मुलं आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, ही महिला आणि तिचं होणारं बाळ हे दोघेही अगदी सुखरूप आहेत.

Pregnant Woman
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • बीड जिल्ह्यातील महिलंचं २०व्यांदा बाळंतपण
  • यापूर्वी महिलेला आहेत ११ मुलं
  • ही महिला प्रथमच रुग्णालयात बाळाला देणार जन्म

बीड: एखाद्या महिलेने दोन, तीन किंवा चार बाळांना जन्म दिल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. मात्र, एक महिलेचं चक्क २०व्यांदा बाळंतपण होणार आहे. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे आणि हे घडत आहे महाराष्ट्रात. राज्यातील बीड जिल्ह्यातील एक ३८ वर्षीय महिला गरोदर असून तिचं हे बाळंतपण २०वं आहे. ही महिला यापूर्वी १९वेळा गरोदर राहिली होती आणि आता ही महिला सात महिन्यांची गरोदर आहे.

बीड जिल्ह्यातील लंकाबाई खरात नावाची ही महिला सात महिन्यांची गर्भवती आहे. ही महिला जिल्हा रुग्णालयात भरती आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे सिविल सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी पीटीआय-भाषा न्यूज एजन्सीला सांगितले की, या महिलेचे ११ मुलं आहेत आणि आता वयाच्या ३८व्या वर्षी ती २०व्यांदा आई बनणार आहे. 

रुग्णालयातील दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, ज्यावेळी ही ३८ वर्षीय महिला गरोदर असल्याचं कळालं तेव्हा तिला गर्भावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेच्या सर्व आवश्यक तपासणी सुरू असून योग्य ते उपचार करण्यात येत आहेत.

ही महिला २०व्यांदा गरोदर झाली आहे. या महिलेची आणि तिच्या होणाऱ्या बाळाची प्रकृती अगदी सुदृढ आहे. तिला औषधे दिली जात आहेत आणि योग्य तो सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले की, ही महिला पहिल्यांदाच रुग्णालयात बाळाला जन्म देणार आहे. यापूर्वी महिलेने सर्व मुलांना आपल्या घरीच जन्म दिला होता. या महिलेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही तिला रुग्णालयात दाखल केलं आहे आणि योग्य तो सल्ला देत आहोत.

लंकाबाई खरात या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील केसापुरी भागात राहतात. बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही महिला अशा समुदायातील आहे जे नागरिक सामान्यत: छोटी-छोटी कामं करुन आपला उदनिर्वाह करत असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी