VIDEO: अचूक नेम साधत तरुणीने पायानेच सोडला निशाण्यावर बाण; तिरंदाजी पाहून तुम्ही घालाल तोंडात बोटं

हर्ष गोयनका यांनी एका तिरंदाजी करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

woman shooting arrow with her feet archery video
अचूक नेम साधत तरुणीने पायानेच सोडला निशाण्यावर बाण  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • उद्योगपती हर्ष गोयनका यांनी हा तिरंदाजी करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
  • या तरुणीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल
  • ट्विटरवर ७ नोव्हेंबरला शेअर झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.

नवी दिल्ली : जगात टॅलेन्टेड लोकांची कमी नाही. सोशल मीडियावर सतत अशा लोकांचे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) होत असतात. असाच एक व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरला असून हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुणी ज्या पद्धतीने पायाने तिरंदाजी (Archery Video) करते, ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

उद्योगपती हर्ष गोयनका यांनी हा तिरंदाजी करणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ शेअर केला आहे, व्हिडिओमधील तरुणी ज्या पद्धतीने आपल्या हातावर उभा राहात पायाने तिरंदाजी करते ते पाहून कोणीही हैराण होईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की ही तरुणी लोखंडाच्या रॉडवर हात ठेवून उभी राहते. तिच्या पायात धनुष्यबाण आहे. यानंतर ती जळणारा बाण यात अडकवून अचूक निशाणा साधते.

या तरुणीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. कारण लोखंडाच्या रॉडवर आपला तोल संभाळत तरुणीने ज्या पद्धतीने अचूक निशाणा साधला आहे, ते सर्वांनाच शक्य नाही. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे.ट्विटरवर ७ नोव्हेंबरला शेअर झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तर १० हजारहून अधिकांनी लाईक केले आहे. हा व्हिडिओ लोकांच्या इतका पसंतीस उतरत आहे की १३०० हून अधिकांनी तो रिट्विट केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी