Diamond कचऱ्यात फेकला १५ कोटींचा चमकणारा खडा, तपासताच समजले की ३४ कॅरेटचा हिरा आहे

Woman Throws A Stone To Waste Turns 34 Carat Diamond Worth 2 Million Dollar । एका महिलेने ३४ कॅरेटचा दुर्मिळ हिरा हा ड्रेसमधील तुटलेला खडा समजून कचऱ्यात टाकला. पण जेव्हा हा तपासण्यात आला त्यावेळी तो दुर्मिळ हिरा असल्याचे लक्षात आले.

Woman Throws A Stone To Waste Turns 34 Carat Diamond
कचऱ्यात फेकला १५ कोटींचा चमकणारा खडा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कचऱ्यात फेकला १५ कोटींचा चमकणारा खडा, तपासताच समजले की ३४ कॅरेटचा हिरा आहे
  • हिऱ्याचे द सीक्रेट स्टोन असे नामकरण करण्यात आले
  • लवकरच द सीक्रेट स्टोनचा लिलाव होणार

Woman Throws A Stone To Waste Turns 34 Carat Diamond Worth 2 Million Dollar । लंडन: एका महिलेने ३४ कॅरेटचा दुर्मिळ हिरा हा ड्रेसमधील तुटलेला खडा समजून कचऱ्यात टाकला. पण जेव्हा हा तपासण्यात आला त्यावेळी तो दुर्मिळ हिरा असल्याचे लक्षात आले. या हिऱ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २० लाख डॉलर (१५ कोटी रुपयांपेक्षा जास्त) पेक्षा जास्त आहे. 

नाण्याच्या आकाराचा हिरा एका महिलेने अनेक वर्षांपूर्वी खरेदी केला होता. ही महिला उत्तर इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. तिने हा हिरा कोणत्या दुकानातून खरेदी केला होता हे आता तिलाही आठवत नाही. या महिलेने घराची स्वच्छता सुरू केली त्यावेळी कुठेतरी कपाटाच्या कोपऱ्यात पडलेला हिरा हा ड्रेसमधील तुटलेला खडा समजून आधी कचऱ्यात टाकला. पण खड्यावर सूर्य प्रकाश पडताच तो खडा चमकला. हे पाहून त्या महिलेला शेजारणीने खड्याची तपासणी करुन घे असा सल्ला दिला. हा सल्ला ऐकून महिलेने खडा कचऱ्यातून उचलून स्वच्छ करुन स्वतः जवळच्या दागिन्यांच्या खोक्यात ठेवला. नंतर महिला हा खडा तपासणीसाठी घेऊन गेली. तिथे हिरे तज्ज्ञांनी रितसर नोंद करुन खडा तपासणीसाठी ठेवला. पण अज्ञात कारणामुळे काही दिवस खड्याची तपासणी झाली नाही. एक दिवस हिरे तपासणाऱ्याने खडा तपासला. तपासणी करताना हा दुर्मिळ हिरा आहे आणि त्याची किंमत ठरवणे आपल्याला अशक्य आहे याची जाणीव तपासनीसाला झाली. यानंतर खडा समजून दुर्लक्षिलेला हिरा एचआरडी डायमंड ग्रेडिंग लॅबमध्ये पाठवण्यात आला. तिथे तज्ज्ञांनी तपासणी करुन हिरा दुर्मिळ असल्याचे सांगितले आणि त्याची किंमत सांगितली. ही किंमत कळताच महिला चक्रावली. आपण एवढा दुर्मिळ आणि महागडा हिरा विसरून गेलो होतो याची जाणीव झाल्यावर तिला धक्का बसला. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेकडे असलेला हिरा ३४.१९ कॅरेटचा एच व्ही एस १ आहे. या दुर्मिळ हिऱ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २० लाख डॉलर पेक्षा जास्त आहे. आता या हिऱ्याला द सीक्रेट स्टोन असे नाव देण्यात आले आहे. महिलेने हा दुर्मिळ, मौल्यवान हिरा एका संस्थेच्या माध्यमातून लिलाव करुन विकण्याचा निर्णय घेतला आहे. हिरा २२ ते २७ लाख डॉलर या किंमतीत विकला जाईल असा अंदाज लिलाव करणाऱ्या संस्थेने व्यक्त केला आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी