[VIDEO] साडी नेसून नाग पकडायला गेली महिला, पाहा पुढे काय घडलं!

व्हायरल झालं जी
Updated Sep 15, 2020 | 13:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

साप पकडण्याचा पेशा जितका आव्हानात्मक आहे त्यापेक्षा जास्त आव्हानात्मक ही गोष्ट आहे की आपल्याला या कामासाठी कोणत्याही वेळी कुठेही जावे लागू शकते.

Snake catcher Nirjhara Chitti
सर्पमित्र निर्झरा चिट्टी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • या व्हिडिओत दिसणाऱ्या निर्झरा चिट्टी साडी नेसून पकडत आहेत नाग
  • एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात फोन घेऊन त्यांनी पकडला नाग
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

मुंबई: साप पकडण्याचा पेशा जितका आव्हानात्मक (Job of catching snakes is challenging) आहे त्यापेक्षा जास्त आव्हानात्मक ही गोष्ट आहे की आपल्याला या कामासाठी कोणत्याही वेळी कुठेही जावे (but more challenging fact is that one needs to go to the place where snake has been found anytime) लागू शकते. एखाद्या ठिकाणी साप आढळल्याची सूचना मिळताच (information of a snake) सर्पमित्रांना त्याठिकाणी पोहोचावे (snake catchers needs to reach there) लागते. सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल (video going viral on social media) होत आहे ज्यावरून एका सर्पमित्राचे काम किती आव्हानात्मक असू शकते याची आपल्याला (idea of how challenging the task of a snake catcher is) कल्पना येईल. या व्हिडिओत एक महिला साडी नेसून साप पकडताना (a woman draped in sari catching snake) दिसत आहे.

या व्हिडिओत दिसणाऱ्या निर्झरा चिट्टी साडी नेसून पकडत आहेत नाग

या व्हिडिओत दिसत आहे की एका घरात साप आढळला आहे आणि त्याला पकडण्यासाठी सदर महिला तिथे पोहोचली आहे. या महिलेने साडी नेसली आहे. ही महिला निर्झरा चिट्टी आहे ज्यांना एका लग्नसमारंभासाठी जायचे होते. त्यासाठी त्या साडी नेसून तयार होत्या. तेव्हाच त्यांना एका घरात नाग आढळल्याची सूचना मिळाली आणि त्या त्याला पकडण्यासाठी तिथे पोहोचल्या. वेळ कमी असल्याने त्या साडीतच गेल्या आणि नागाला पकडण्यात गुंतल्या.

एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात फोन घेऊन त्यांनी पकडला नाग

निर्झरा चिट्टी आणि तिचे पती आनंद चिट्टी हे कर्नाटकच्या बेळगावातील वन्यजीवतज्ञ आहेत. या दांपत्याने स्वतःचे यूट्यूब चॅनेल काढले आहे ज्यावर ते साप वाचवण्याचे त्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात आणि जनजागृती करतात. जो व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे त्यात निर्झरा चिट्टी साडी नेसून नागाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दिसत आहे की एका हातात मोबाईल घेऊन एका छडीच्या सहाय्याने त्या कपाटात लपून बसलेल्या नागाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

यानंतर आपली साडी सांभाळत त्या दुसऱ्या हाताने सापाची शेपूट पकडून त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. साडी नेसल्यामुळे त्यांना या कामात थोडीशी अडचण येत आहे, पण शेवटी त्यांना या नागाला पकडण्यात यश येते आणि त्या नागासह घराबाहेर येतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

हा व्हिडिओ डॉ. अजयिता नामक एका यूजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे याला आत्तापर्यंत एक लाख ९२ हजार ७००पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. याला ८३०० लाईक्स मिळाले आहेत आणि २१०० वेळा हा व्हिडिओ रीट्वीट करण्यात आला आहे.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी