शॉर्ट ड्रेस घालणाऱ्या तरूणींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महिलेनं मागितली माफी

व्हायरल झालं जी
Updated May 02, 2019 | 19:45 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

शॉर्ट ड्रेस घालणाऱ्या तरूणींवर बलात्कार झाला पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महिलेचं मतपरिवर्तन झालं आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिलेनं आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.

The apology was made on the Facebook account of the accused
महिलेनं मागितली आपल्या वक्तव्याची क्षमा  |  फोटो सौजन्य: Times Now

गुरूग्राम: आपल्या मैत्रिणींसोबत रेस्ट्रॉरंटमध्ये बसलेल्या काही तरूणींबाबत एका मध्यमवयाच्या महिलेनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या तरूणींकडे बघून महिलेनं ‘या मुली शॉर्ट ड्रेस घालून लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. या सर्व मुली शॉर्ट ड्रेस घालून तसंच नेकेड होत बलात्कार करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतात’, असं वक्तव्य या महिलेनं केलं होतं. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर सर्वत्र क्षेत्रातून या महिलेवर टीका करण्यात आली. त्यामुळं महिलेनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंबंधी क्षमा मागितली आहे.

आपल्या फेसबुक अकाऊंटवर महिलेनं लिहिलं, मी खूप ‘कठोर आणि चुकीचं’ बोलली. मी केलेल्या वक्तव्याची माफी मागितल्यानंतर महिलेनं आपलं सोशल मीडिया अकाऊंट डिलिट केलं आहे.

 

 

जाणून घ्या काय घडलं होतं नेमकं

दिल्लीतील एका रेस्ट्रॉरंटमध्ये मध्यम वयाच्या महिलेनं तरूणींच्या शॉर्ट कपड्यांवरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आपल्या समोर बसलेल्या मुलींकडे बघून महिलेनं म्हटलं, असे शॉर्ट ड्रेस घालून लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. या सर्व मुली शॉर्ट ड्रेस आणि नेकेड होत स्वत:वर बलात्कार करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतात.

महिलेच्या या वक्तव्यानंतर तिथं उपस्थित त्या तरूणींनी महिलेला प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आणि त्यांनी महिलेला सुनावलं. एक महिला असून दुसऱ्या मुलींबद्दल असं बोलून तुम्ही बलात्कार करणाऱ्यांना प्रोत्साहित करत असल्याचं या मुलींनी म्हटलं. मात्र महिलेनं ऐकलं नाही. मग ही महिला मॉलमध्ये गेली तिथं या तरूणी महिलेच्या मागे मागे गेल्या आणि त्यांनी तिला प्रश्न विचारून आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरूवात केली. या व्हिडिओमध्ये महिलेनं केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी क्षमा मागावी, अशी मागणी या तरूणी करत आहेत. पण महिला त्यांच्याकडे लक्ष न देता पुन्हा तेच बोलत आहे.

तिथं उपस्थित एक दुसरी महिला सुद्धा या महिलेला समजावण्याचा प्रयत्न करते आणि तिचं वक्तव्य कसं चुकीचं आहे हे सांगते. पण ती महिला सॉरी म्हणत नाही. तरूणींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर महिलेच्या या वक्तव्यावर सर्वच थरातून टीका केली जात आहे. टीकेची धनी झाल्यानंतर या व्हायरल आन्टीनं आता या तरूणींची माफी मागितली आहे.

हा व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडिओ शेअर झाल्या-झाल्या लगेच त्याला फेसबुकवर ३२ हजारांहून अधिक व्यूज मिळाले.तर हा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी शेअर केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी