Viral: अरे बापरे! हॉटनेसमुळे महिलेला मिळत नाही काम! काय आहे प्रकरण? 

व्हायरल झालं जी
Updated May 18, 2022 | 13:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral News In Marathi | जगातील प्रत्येकाला सुंदर आणि हॉट दिसण्याची इच्छा असते. यासाठी अनेकजण स्वत:वर भरपूर पैसाही खर्च करतात.

Women do not get work due to hotness 
हॉटनेसमुळे महिलेला मिळत नाही काम! काय आहे प्रकरण?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जगातील प्रत्येकाला सुंदर आणि हॉट दिसण्याची इच्छा असते.
  • लंडनमधील महिलेला हॉटनेसमुळे काम मिळत नाही.
  • ही महिला सोशल मीडियावर 'जुजू ब्राझील' या नावाच्या आयडीने प्रसिद्ध आहे.

Viral News In Marathi | मुंबई : जगातील प्रत्येकाला सुंदर आणि हॉट दिसण्याची इच्छा असते. यासाठी अनेकजण स्वत:वर भरपूर पैसाही खर्च करतात. जो जास्त सुंदर आणि हॉट आहे त्याचा चाहता वर्ग तसेच त्याला मागणी देखील मोठी असते सर्वजण त्याला पसंत करतात असा समज आहे. पण एका महिलेसोबत काहीसे उलटेच घडले आहे. कारण या महिलेचे सुंदर सौंदर्यच तिचे शत्रू बनले. लक्षणीय बाब म्हणजे या महिलेच्या हॉटनेसमुळे तिला कोणी विचारत आहे ना कोणी नोकरी देत ​​आहे. त्यामुळे महिला चांगलीच अस्वस्थ झाली असून ती महिला सध्या खूप चर्चेत आहे. (Women do not get work due to hotness).

अधिक वाचा : काँग्रेस नेते मोबाईलमधे मश्गुल असतात - हार्दिक पटेल

 अस्वस्थ असलेले मॉडेल 

दरम्यान, लंडनमध्ये राहणारी ही महिला सोशल मीडियावर 'जुजू ब्राझील' या नावाच्या आयडीने प्रसिद्ध आहे. एवढेच नाही तर जुजू पेशाने मॉडेलही आहे. जुजू तिच्या सौंदर्य आणि हॉटनेसबद्दल खूप चिंतित आहे, कारण यामुळे तिला कोणतेही काम मिळत नाही. ती म्हणते की लोक तिच्याशी भेदभाव करत आहेत. या अस्वस्थ मॉडेलचे म्हणणे आहे की, टीव्ही सीरियलमध्ये काम करण्याचे तिचे स्वप्न होते. पण हॉट लूकमुळे तिला काम मिळत नाहीये. लोक तिला रिॲलिटी शोमध्ये पाहू इच्छित नाहीत. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, लोक तिला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालण्यासाठी धमकावत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Julia (@juju.brazil)

हॉटनेसमुळे वाढली डोकेदुखी

जुजूने सांगितले की, मी हॉट असल्यामुळे मला अनेक प्रकारच्या पक्षपाताचा सामना करावा लागला आहे. आता याबद्दल मला उघडपणे बोलायचे आहे. इतकेच नाही तर जेव्हा कोणी इंटरव्ह्यू देते तेव्हा त्यांच्या हॉटनेसमुळे लोक विचलित होतात. मात्र लोक तिला सोशल मीडियावर खूप पसंत करतात. तिचे इंस्टाग्रामवर एक लाख ६ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. मात्र असे असून देखील ती काम नसल्यामुळे चिंतेत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी