बापरे! चुकीच्या रेल्वेमध्ये बसल्याचं लक्षात येताच महिलेनं मुलांना चालत्या ट्रेनच्या खाली फेकलं ,अन्... पहा व्हिडिओ

मध्य प्रदेशच्या उज्जैन रेल्वे स्थानकावर (Ujjain railway station) एका चालत्या ट्रेनमधून एका महिलेनं मुलांना खाली फेकल्यानंतर स्वत: तिनेही रेल्वेमधून उडी मारल्याची घटना घडली आहे.  दरम्यान उडी मारल्यानंतर ही महिला चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली होती.

 woman threw the children from the moving train
येताच महिलेनं मुलांना ट्रेनच्या खाली फेकलं अन्  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • एक व्यक्ती, त्याची पत्नी आणि दोन मुले सकाळी साडेसहा वाजता सिहोरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसण्यासाठी स्टेशनवर आले.
  • महिला चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर तिने आपल्या मुलांना चालत्या रेल्वेमधून फेकून दिलं.
  • रेल्वे पोलीस हवालदारानं महिलेला वाचवलं

उज्जैन : मध्य प्रदेशच्या उज्जैन रेल्वे स्थानकावर (Ujjain railway station) एका चालत्या ट्रेनमधून एका महिलेनं मुलांना खाली फेकल्यानंतर स्वत: तिनेही रेल्वेमधून उडी मारल्याची घटना घडली आहे.  दरम्यान उडी मारल्यानंतर ही महिला चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली होती. परंतु उज्जैन (Ujjain) रेल्वे स्थानकावरील मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) एका कॉन्स्टेबलने त्या महिलेचा जीव वाचवला. सोशल मीडियावर हा  व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या महिलेने धावत्या ट्रेनमधून आपल्या मुलांना फेकल्याचं आणि त्यानंतर तिने उडी मारल्याचं स्पष्ट दिसत आहे. 

महिलेने आधी मुलांना फेकले आणि नंतर 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला उडी मारल्यानंतर डब्याच्या दरवाजाजवळ घसरली आणि ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील खड्ड्यात पडण्याचा धोका होता. मात्र आरपीएफ हवालदार मुकेश कुशवाह यांनी वेळीच महिलेला बाहेर खेचले. मुकेश कुशवाह यांच्या या धाडसाचे लोक कौतुक करत आहेत, त्यामुळे महिलेचा जीव वाचला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, कॉन्स्टेबल मुकेश कुशवाह यांना त्यांच्या तत्पर कार्यासाठी  बक्षीस दिले जाईल. 

जीआरपीचे पोलीस अधीक्षक यांनी ही माहिती दिली

जीआरपीच्या पोलिस अधीक्षक निवेदिता गुप्ता म्हणाल्या, 'मी तात्काळ कॉन्स्टेबलला 500 रुपयांचे बक्षीस दिले आहे. मी GRP इन्स्पेक्टर राधेश्याम महाजन यांना मुकेश कुशवाह यांना बक्षीस देण्यासाठी शिफारस पत्र लिहिण्यास सांगितले आहे. इन्स्पेक्टर राधेश्याम महाजन पुढे म्हणाले, 'एक व्यक्ती, त्याची पत्नी आणि दोन मुले सकाळी साडेसहा वाजता सिहोरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसण्यासाठी स्टेशनवर आले होते. ही महिला चुकून जयपूर-नागपूर ट्रेनमध्ये चढली. तिने आपल्या चार आणि सहा वर्षांच्या मुलांना प्लॅटफॉर्मवर फेकून दिले आणि नंतर चालत्या ट्रेनमधून उडी मारली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी