तारेइतकी पातळ बिकिनीवर फिरत होती पर्यटक महिला, पोलिसांनी केले अटक केला दंड 

व्हायरल झालं जी
Updated Oct 14, 2019 | 16:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका महिला पर्यटकाला (Tourist) बीचवर बिकिनी (Bikni) परिधान करून फिरणे महागात पडले. पोलिसांनी तिला अटक करून मोठा दंड लावला. महिलेचा फोटो होतोय व्हायरल.. 

women tourist fined for wearing bikini in the philippines viral news in marathi
तारेइतकी पातळ बिकिनीवर फिरत होती पर्यटक महिला  |  फोटो सौजन्य: फेसबुक

थोडं पण कामाचं

  • महिला पर्यटकाने समुद्र किनारी फिरताना परिधान केली धाग्यासारखी दिसणारी बिकिनी
  • हे प्रकरण फिलीपिन्सच्या सुप्रसिद्ध पर्यटक बेट बोराके येथील आहे. 
  • ही पर्यटक तायवानची असल्याची माहिती समोर येत आहे
  • पोलिसांनी पर्यटक महिलेला अटक करून दंड लावला आहे, पर्यटकांना सांगितले की संस्कृतीचा सन्मान करा 

नवी दिल्ली :  एका २६ वर्षीय महिला पर्यटकला बिकिनी परिधान करून समुद्र किनारे फिरणे खूप महागात पडले. पोलिसांनी महिलेला अटक करून तिच्याकडून मोठा दंड आकारला. महिलेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती एका तारेच्या पातळ बिकिनी परिधान करून फिरत आहे. हा फोटो पोलिसांनी ऑनलाइन पाहिला आणि तेही हैराण झाले. या संदर्भात त्वरित कारवाई करत महिलेला अटक केली. 

हे प्रकरण फिलिपिन्सचे आहे. तायवानची रहिवाशी असलेले लिन जू तिंग नावाची २६ वर्षीय महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिलिपिन्समध्ये पर्यटनाला आली होती. यावेळी ती फिलिपिन्सचे प्रसिद्ध पर्यटन बेट बोराके येथे आली होती. तिंग येथील पुका बिचवर अनेक वेळा फिरायला गेली. या दरम्यान, तिचे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केले, थोड्याच वेळात हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात तिंग एका तारेच्या आकारा एवढी पातळ बिकिनी परिधान केलेली दिसली. 

लवकरच हा फोटो पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला. पोलिसांनी नंतर तिचा शोध काढत तिला अटक केले. दरम्यान, अजून स्पष्ट झाले नाही की तिंग हिच्यावर कोणत्या कलमाखाली कारवाई करण्यात आली. पण ज्या पद्धतीने अटक झाली, ती बिकिनी परिधान केल्यामुळेच झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

मयलचे पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी बुधवार आणि गुरूवारी तिंग यांच्या बिकिनीचे फोटो घेतले. ती बिकिनी एका तारे इतकी पातळ होती. आमचा रूढी आणि परंपरेत असे करण्याची परवानगी नाही. तर तिंग हिने सांगितले की मला माहिती नव्हते की या बेटावर बिकिनी परिधान करण्यास परवानगी नाही. 

या साठी २५०० फिलीपीन पेसो ( ३४०० रुपये ) दंड ठोठावण्यात आला. तसेच तिंग हिला आदेश दिले की ११ ऑक्टोबर पर्यंत द्वीप सोडण्यापूर्वी ही रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी