World Fastest Public Train: ही आहे जगातील सर्वात वेगवान प्रवासी ट्रेन, चाकांनी नव्हे तर चुंबकाच्या सहाय्याने धावते

व्हायरल झालं जी
Updated Mar 23, 2023 | 13:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Fastest Public Train news : जगातील सर्वात वेगवान प्रवासी ट्रेन कुठे धावते हे तुम्हाला माहिती आहे का? ती ट्रेन लोखंडी चाकांवर चालत नाही, तर चुंबकाच्या साहाय्याने रुळांवरून अक्षरशः उडत जाते.   

या ट्रेनला लोखंडी चाके नाहीत
Shanghai Maglev Train जगातली सर्वात वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जाते.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जगातील सर्वात वेगवान ट्रेनचा आनंद घेण्यासाठी केवळ चिनी लोकच नाही तर परदेशी लोकही चीनमध्ये पोहोचतात.
  • शांघाय मॅग्लेव्ह ट्रेन  (Shanghai Maglev Train) असे या ट्रेनचे नाव आहे.
  • तुम्ही अनेकवेळा ट्रेनमधून तसेच जलद एक्स्प्रेस मधून प्रवास केला असेल.

China Fastest Public Train in World : तुम्ही अनेकवेळा ट्रेनमधून तसेच जलद एक्स्प्रेस मधून प्रवास केला असेल.  त्यावेळी कधी सिग्नलमुळे तर कधी सिग्नल नसतानादेखील ट्रेन रुळावर अनेक वेळा थांबली असल्याचे तुम्ही पाहिले असेल. ज्यामुळे तुमचा वेळ आणि खर्च दोन्ही वाया जातो. अशावेळी मनात विचार येतो कि, एखादी अशी ट्रेन असावी, जी पाहिजे त्या ठिकाणी अतिशय वेगात पोहोचवू शकेल. आज आम्ही या लेखाद्वारे अश्याच एका वेगवान ट्रेनबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. ज्याचा वेग पाहून तुम्ही चकित व्हाल.  (world fastest public train shanghai maglev in china read in marathi)

जगातील सर्वात वेगवान ट्रेन

जगातली सर्वात वेगवान ट्रेन आपल्या शेजारी देशात चीनमध्ये आहे. शांघाय मॅग्लेव्ह  (Shanghai Maglev Train) असे या ट्रेनचे नाव आहे. ही ट्रेन शांघायच्या पुडोंग विमानतळास लाँगयांग रोड स्टेशनला जोडते. या ट्रेनचा कमाल वेग  460 किमी प्रती तास एवढा आहे. थोडक्यात काय तर, आपली एक्स्प्रेसस नोएडा ते अलाहाबाद हे 700 किमी चे अंतर कापून जाण्यास सुमारे 10-12 तास लावते, पण या सुपर स्पीड ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही हेच अंतर दीड ते दोन तासात कापू शकता. 

अधिक वाचा : ​राज ठाकरे जोरदार बरसले, जाणून घ्या भाषणातले imp मुद्दे

या ट्रेनला लोखंडी चाके नाहीत

या ट्रेनचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे Shanghai Maglev Train ही ट्रेन लोखंडी चाकावर चालत नाही. तर मॅग्नेटिक लेव्हिटेशनने चालते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, या रुळांवर चुंबकीय प्रभाव पसरलेला असतो आणि ट्रेन रुळांच्या थोड्या वर हवेत राहते. रुळांवरील चुंबकीय प्रभावामुळे ट्रेन इकडे तिकडे वळत नाही आणि कोणताही आवाज न करता प्रचंड वेगाने पळून जाते. 

चीनने जर्मन तंत्रज्ञान स्वीकारले

या वेगवान ट्रेनचे तंत्रज्ञान मुळतः जर्मनीचे आहे, ज्याचा चीनने स्वीकार केला आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना अतिशय सुलभ आणि घर्षणमुक्त प्रवासाचा आनंद घेता येतो. चीनमध्ये ही ट्रेन गेल्या एक दशकापासून सेवेमध्ये आहे, आणि आता चीनने 600 किमी प्रति तास वेगाने स्वतःची मॅग्लेव्ह ट्रेन तयार केली आहे. जी जगातली सर्वात वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच सर्वात वेगवान ट्रेनचा किताब अजूनही शांघाय मॅग्लेव्ह ट्रेनकडेच आहे.

अधिक वाचा : ​कधी आहे जागतिक हवामान दिन, काय आहे या दिवसाचे महत्त्व?

प्रवास करण्याअगोदरच करावी लागते प्री-बुकिंग

जगातील या सर्वात वेगवान ट्रेनची लांबी 153 मीटर, उंची 4.2 मीटर आणि रुंदी 3.7 मीटर आहे. या ट्रेनमध्ये एकूण 574 प्रवासी प्रवास करू शकतात. या ट्रेनमध्ये 3 प्रकारचे डबे आहेत, ज्यामध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि शेवटचा विभाग आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करण्याअगोदरच बुकिंग करावे लागते. जगातील सर्वात वेगवान ट्रेनचा आनंद घेण्यासाठी केवळ चिनी लोकच नाही तर परदेशी लोकही चीनमध्ये पोहोचतात.      

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी