भारतातील या ठिकाणच्या सौंदर्याने वेडावला विदेशी पाहुणा, फोटो बघून म्हणाल, 'मेरा भारत महान'

Udupi Beach: एका विदेशी पाहुण्याने भारतातील एका सुंदर ठिकाणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या ठिकाणाचा फोटो बघून भारतीय नागरिक पण चक्रावले आहेत. एवढे सुंदर ठिकाण स्वतःच्या देशात असूनही आपण तिथे फिरायला कधीही का गेलो नाही, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

World most beautiful cycling route in Udupi beach Karnataka
भारतातील या ठिकाणच्या सौंदर्याने वेडावला विदेशी पाहुणा 
थोडं पण कामाचं
  • भारतातील या ठिकाणच्या सौंदर्याने वेडावला विदेशी पाहुणा
  • ठिकाण कर्नाटकमधील उडुपी (Udupi) येथे आहे
  • फोटोत समुद्रामधून जाणार एक रस्ता दिसत आहे

Udupi Beach: भारतीय नागरिक परदेशी फिरायला जाण्याची संधी मिळाली की जास्त आनंदी होतात. हे देशातले सर्वसाधारण चित्र आहे. पण भारतातही काही ठिकाणं प्रचंड सुंदर आहेत. या ठिकाणांविषयी नागरिकांना पुरेशी माहिती नाही. भारतीयांना भलेही या सुंदर ठिकाणांची माहिती नसेल पण एका विदेशी पाहुण्याने अशाच एका सुंदर ठिकाणाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हे सुंदर ठिकाण भारतात आहे. या ठिकाणाचा फोटो बघून भारतीय नागरिक पण चक्रावले आहेत. एवढे सुंदर ठिकाण स्वतःच्या देशात असूनही आपण तिथे फिरायला कधीही का गेलो नाही, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. अनेकांचा हे ठिकाण भारतात आहे यावरच विश्वास बसलेला नाही.

ग्रीन बेल्ट अँड रोड संस्थेचे अध्यक्ष एरिक सोलहेम (Erik Solheim) यांनी भारतातील एका सुंदर ठिकाणाचा फोटो ट्वीट केला आहे. हे ठिकाण कर्नाटकमधील उडुपी (Udupi) येथे आहे. फोटोत समुद्रामधून जाणार एक रस्ता दिसत आहे. एरिक सोलहेम (Erik Solheim) यांनी हा फोटो ट्वीट करत 'अतुल्य भारत' असे म्हटले आणि पुढे फोटोविषयीची माहिती दिली आहे.

जगातील सर्वात सुंदर सायकल चालविण्याचा रस्ता अशा शब्दात एरिक सोलहेम (Erik Solheim) यांनी फोटोत दिसत असलेल्या ठिकाणाविषयी मत व्यक्त केले आहे. या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर बाइक चालवावी अशी इच्छा असल्याचेही एरिक सोलहेम (Erik Solheim) यांनी ट्वीटच्या माध्यमातून जाहीर केले.

फोटो बघून चक्रावून जाल

फोटो बघून चक्रावून जाण्याची शक्यता आहे. भारतात एवढे सुंदर ठिकाण पाहून एकाचवेळी आश्चर्य आणि अभिमान अशा दोन भावना मनात निर्माण होतात. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडं दिसत आहेत. निळ्याशार समुद्रामधून जाणारा रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडं असा हा निसर्गरम्य फोटो आहे. समुद्रामधून जाणाऱ्या या सुंदर रस्त्याचा फोटो बघून अनेकांली ट्वीट लाइक केले आहे. तसेच कित्येकांनी हे ट्वीट रीट्वीट केले आहे. ट्वीट बघणाऱ्या अनेकांनी या ठिकाणी फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी