ही आहेत जगातली सर्वात महागडी द्राक्षे, किंमत ऐकूनच व्हाल अवाक्

व्हायरल झालं जी
Updated Mar 29, 2023 | 13:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Most Expensive Grapes: या जगामध्ये फळांच्या अनेक जाती आणि प्रजाती आहेत. प्रत्येक हंगामात लोकं आवडीने फळ घरी घेऊन येतात. मात्र, अशी काही फळं आहे,की ज्यांची फक्त किंमत ऐकूनच पोट भरते. एवढेच नाही तर अमीर माणसांना देखील ह्या फळांचा आस्वाद घेणे काहीवेळा जमत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फळाबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुम्ही तोंडात बोट घालाल!

World Most Expensive Grapes,
ही आहेत जगातली सर्वात महागडी द्राक्ष  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • श्रीमंत लोकं ही द्राक्ष खाण्यासाठी असतात उत्सुक
  • या द्राक्षाचा रंग लाल भडक असतो, याला रेड ग्रेप्स असे म्हंटले जाते
  • एक घडाची किंमत ऐकूनच भरेल पोट

Red Grapes Rate जपानमध्ये द्राक्षाच्या अशा अनेक प्रजाती आहेत, ज्यापैकी एका द्राक्षाच्या गुच्छ्याची किंमत आठ लाख इतकी आहे. ही द्राक्ष विकत घेणे कोणा सामान्य माणसाचे काम नाही.  ही महागडी द्राक्ष खाण्यासाठी इच्छुक श्रीमंत लोक खूप इच्छुक असतात.  (World Most Expensive Grapes)

या जगामध्ये फळांच्या अनेक जाती आणि प्रजाती आहेत. प्रत्येक हंगामात लोकं आवडीने फळ घरी घेऊन जातात. मात्र, अशी काही फळं आहे, ज्यांची किंमत ऐकूनच पोट भरते. एवढेच नाही तर अमीर माणसांना देखील ह्या फळांचा आस्वाद घेणे कधी कधी जमत नाही. आज आज आम्ही तुम्हाला अशाच एका फळाबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत ऐकून तुम्ही तोंडात बोट घालाल! 

अधिक वाचा : Mulethi Benefits: ज्येष्ठमध खाण्याची योग्य पद्धत कोणती?

आपल्या सर्वांना माहिती आहे की जगत द्राक्षाच्या अनेक प्रजाती आहेत, सामान्यपणे आपण सर्वांनी हिरवी आणि काळी द्राक्षे खालली असतील. ही द्राक्षे बाजारभावात 100 ते 200 रुपये प्रती किलो दराने मिळतात. पण, आज आपण ज्या द्राक्षाबद्दल बोलणार आहोत त्याचे नाव आहे 'रेड ग्रेप्स'. 

हे द्राक्ष नावाप्रमाणे रंगाने लाल आहे आणि त्याचा एका गुच्छ्याची किंमत इतकी आहे की तुम्ही कल्पना देखील करणार नाही. या द्राक्षाच्या घडाची किंमत सुमारे आठ लाख रुपये असून त्यात सुमारे 24 द्राक्षे असतात. या द्राक्षाची किंमत ऐकून धक्का बसला ना? पण ही खरं आहे 

अधिक वाचा : ​IPL मॅचचे तिकीट खरेदी करण्याची सोपी पद्धत

श्रीमंतांचे फळ 

आता तुम्ही विचार करत असाल की, या 'रेड ग्रेप्स' चे पीक कुठे येते? त्याची शेती कुठे आहे?  तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, द्राक्षाची ही प्रजाती जपानच्या ईशीकिवा शहरामध्ये विकसित करण्यात आली होती. 1995 मध्ये शेतकऱ्यांनी या द्राक्षासाठी प्रीफेक्चरल कृषी संशोधन केंद्राकडे अपील केले होते. हा प्रयोग सुमारे दोन वर्ष चालला. अहवालानुसार 400 वेलीपैकी केवळ चारच लाल द्राक्ष बाहेर आली. ही द्राक्षे पाहून लोक हरपली आणि रेड ग्रेप्स ने मनं जिंकली. तेव्हापासून या द्राक्षाची लागवड तिथे सातत्याने सुरू झाली. हे एक द्राक्ष सुमारे 20 ग्रॅम भरते.  

लोकं याला श्रीमंतांचे फळ असे देखील म्हणतात. करण ही द्राक्ष विकत घेणे प्रत्येकांच्या खिशाला परवडणारे नाही. जपानमध्येही लोकांना ही द्राक्षे सहजासहजी मिळत नाहीत. मग तुम्हाला देखील ही महागडी द्राक्ष खायची इच्छा झाली का? 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी