जगातील सर्वात 'छोटी' महिला ज्योती आमगेच्या घरी 'मोठी' चोरी 

व्हायरल झालं जी
Updated Nov 20, 2019 | 15:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jyoti Amge : चोरांनी जगातील उंचीने सर्वात छोटी महिला असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगे यांच्या घरी मोठी चोरी केली आहे. ज्योती यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी केस दाखल

world s shortest woman  jyoti amge s house burgled in nagpur case registered crime news in marathi google newsstand
जगातील सर्वात 'छोटी' महिला ज्योती आमगेच्या घरी 'मोठी' चोरी   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • जगातील सर्वात छोटी महिला ज्योती आमगेच्या घरी चोरी 
  • अमेरिकेला गेली होती ज्योती, घरी परतल्यावर चोरी झाल्याचे उघड 
  • चोरांनी घरातून रोख रक्कम आणि दागिने केले लंपास 

नागपूर :  चोरांनी जगातील उंचीने सर्वात छोटी महिला असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगे यांच्या घरी मोठी चोरी केली आहे.  चोरांनी रोख रक्कम आणि काही दागिन्यांसह एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी झाली. चोरीची घटना ज्योती घरी नसताना घडली आहे. ती आपल्या आई-वडिलांसह एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती यांच्या घरी ही चोरीची घटना रात्री एक ते साडे तीनच्या दरम्यान घडली आहे. 

अमेरिकेहून आपल्या आई-वडिलांसह ज्योती पहाटे डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर पोहचली तेव्हा त्यांना रिसीव्ह करण्यसाठी तिचा भाऊ सतीश आमगे आणि त्यांची पत्नी एअरपोर्टला रवाना झाली. याच दरम्यान, संधी साधून चोरांनी घरात प्रवेश केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी कपाट ठेवलेले १५ हजार रुपये रोख आणि सोन्याच्या ती अंगठ्या चोरल्या. घरातील रोख रक्कम आणि दागिने मिळून ६० हजार रुपयांची चोरी केली. 

कुटुंब जेव्हा एअरपोर्टवरून घरी पोहचले तेव्हा ही चोरी उघड झाली. चोरांनी घराचा मुख्य दरवाजा तोडला. चोरीच्यी घटनेबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. तसेच भागातील सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात येत आहे. 

ज्योती आमगे ही जगातील सर्वात कमी उंची असलेली महिला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार तिची उंची ६२.८ सेंटीमीटर (२ फूट ०.६ इंच आहे. तसेच ती टीव्ही रिअलिटी शो 'बिग बॉस ६' मध्येही भाग घेतला आहे. तसेच लोणावळा येथील सेलिब्रिटी व्हॅक्स म्युझिअममध्ये तिचा मेणाचा पुतळाही आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी