viral Photo: व्वा भाई वा ! ट्यूशनला जाण्यासाठी मुलाचा दररोज सायकलसोबत मेट्रोने प्रवास; फोटो व्हायरल

सोशल मीडियावर (Social media) विविध प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. त्यातील अनोखी गोष्ट नेटकऱ्या तो व्हिडिओ पाहण्यास भाग पाडत असतात. निवृत्त (Retired) आयएएस अधिकारी (IAS Officer)आरए राजीव यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्येही अशीच अनोखी आणि अगळीवेगळी गोष्ट आहे.

child travels by metro with a bicycle every day to go to tuition
ट्यूशनला जाण्यासाठी मुलाचा दररोज सायकलसोबत मेट्रोने प्रवास  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुलगा दररोज ट्युशनला जाण्यासाठी मेट्रोने आपल्या सायकलसोबत प्रवास करतो.
  • लोकल ट्रेन सायकल घेऊन जाण्यासाठी 200 रुपये शुल्क आकारत असते.
  • लोकल ट्रेनमध्येही सायकलस्वारांसाठी आणखी एक डबा जोडून सायकल चालवण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे

मुंबई :  सोशल मीडियावर (Social media) विविध प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. त्यातील अनोखी गोष्ट नेटकऱ्या तो व्हिडिओ पाहण्यास भाग पाडत असतात. निवृत्त (Retired) आयएएस अधिकारी (IAS Officer)आरए राजीव यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्येही अशीच अनोखी आणि अगळीवेगळी गोष्ट आहे. एक लहान मुलगा ट्युशनला जाण्यासाठी आपल्या सायकलसोबत मेट्रोने प्रवास करत आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Wow bro! A child travels by metro with a bicycle every day to go to tuition; The photo went viral)

अधिक वाचा  : काही खाता बरोबर पोट फुगतं, ही गोष्ट खा मिळेल आराम

फोटोतील मुलगा दररोज ट्युशनला जाण्यासाठी मेट्रोने आपल्या सायकलसोबत प्रवास करतो. फोटोमधील मुलगा तो त्याची सायकल मेट्रोच्या आत सहजपणे पार्क  करतो. तो मेट्रो सेवेमुळे तो खूपच आनंदी दिसत आहे. मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर हा मुलगा आपल्या सायकलीने ट्यूशनला जातो. 

अधिक वाचा  : लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर

निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांनी पोस्ट केलेला हा फोटो इतका बोलका आहे की, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, पेट्रोलियम, नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनाही याकडे दूर्लक्ष करता आले नाही. या फोटोवर कमेंटही केली आहे. #AmritKaal च्या माध्यमातून भारताचा प्रवास मुंबईतील या आत्मविश्वासी प्रवाशासारख्या स्मार्ट आणि कल्पक मुलाप्रमाणे केला जातोय. जो दररोज त्याच्या शिकवणीसाठी मेट्रोने प्रवास करतो आणि शेवटच्या माइल कनेक्टिव्हिटीसाठी आपली सायकलने प्रवास करतो. भारताच्या भविष्याचे वारसदार आणि चालक!"
दरम्यान, नेटिझन्स सुद्धा या मुलाची कथेने प्रभावित झाले आहेत. 

अधिक वाचा  : अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन

एक युझर म्हणाला की,  निदान मेट्रो ट्रेन सायकल घेऊन  जाण्यासाठी कोणतेच पैसे घेत नाही. परंतु लोकल ट्रेन सायकल घेऊन जाण्यासाठी 200 रुपये शुल्क आकारत असते. लोकल ट्रेनमध्येही सायकलस्वारांसाठी आणखी एक डबा जोडून सायकल चालवण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. मला आशा आहे की, बर्‍याच लोकांना नक्कीच प्रोत्साहित करेल. ”असंही  युझर म्हणाला. 

अधिक वाचा  :  त्वचेसाठी टोमॉटो आहे फायदेशीर आहे, चेहरा होईल चमकदार

दुसर्‍याने लिहिले की, "खूप आत्मविश्वासपूर्ण, कार्यक्षमता आणि सोयींची जाणीव आहे. आम्हाला आशा आहे की तो ऑटो, कार, अवजड वाहनांना त्रास न देता. तसेच न घाबरता सुरक्षितपणे तो सायकल चालवत त्याच्या गंतव्यस्थानी आणि परत येईल. सायकलस्वारांचा आदर करणे आवश्यक आहे. मुला चिअर्स." तिसर्‍या युझरने टिप्पणी केली की, "मला वाटले की हे चित्र युरोपचे आहे कारण मी तेथे अनेक लोकांना सायकलने प्रवास करताना पाहिले आहे. 

भारतात असे होईल असे कधीच वाटले नव्हते." कोणीतरी जोडले, "हे खूप छान आहे! आम्हाला दिल्ली मेट्रोमध्ये अशी सेवा मिळाली असती तर बरं झालं असतं." त्यानंतर एकाने लिहिलं की, तरुण-तरुणी, आणि ट्युशनसाठी जाणाऱ्यासाठी अशी जागा असणं गरजचे आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी