Old Coin: तुमच्याकडे असं 10 पैशांचं नाणं आहे का? एका झटक्यात कमावू शकता हजारो रुपये

1957 ते 1963 या कालावधीतील 10 पैशांच्या नाण्याला सध्या सर्वाधिक मागणी आहे. भारत गणराज्यात तयार झालेली ही सगळ्यात पहिली नाणी होती. त्यावेळच्या नाण्यांवर 'नवे पैसे' असे लिहिले जात असे. 1963 नंतर सरकारने ही प्रणाली रद्द केली.

Old Coin
हे नाणं असेल तर कमवू शकता हजारो रुपये  |  फोटो सौजन्य: Indiatimes, Representative Image
थोडं पण कामाचं
  • जुनी नाणी असणाऱ्यांना सुवर्णसंधी
  • एका नाण्याचे मिळतील हजारो रुपये
  • जुन्या नाण्यांना ऐतिहासिक महत्त्व

Old Coin: जुनी नाणी (Old Coins) गोळा करण्याचा छंद असणारे लोक आज हजारो रुपये कमवू शकतात. किंबहुना आपल्यापाशी असणारी नाणी विकून अशा लोकांनी आतापर्यंत हजारो रुपये कमावलेदेखील आहेत. भारत सरकारच्या (Government of India) जुन्या नाण्यांच्या बदल्यात हजारो रुपये कमावण्याची संधी सध्या चालून आली आहे. विशेषतः 1957 ते 1963 या कालावधीतील 10 पैशांच्या नाण्याला सध्या सर्वाधिक मागणी आहे. भारत गणराज्यात तयार झालेली ही सगळ्यात पहिली नाणी होती. त्यावेळच्या नाण्यांवर 'नवे पैसे' असे लिहिले जात असे. 1963 नंतर सरकारने ही प्रणाली रद्द केली. त्यानंतर प्रत्येक नाण्यावर केवळ 'पैसे' असंच लिहिलं जाऊ लागलं.

नाणी असेल तोच श्रीमंत

सध्या या जुन्या नाण्यांना इतकं महत्त्व आलं आहे, की ही नाणी ज्याच्याकडे असतील, तो सर्वात श्रीमंत बनू शकतो. भारत सरकारने तांबे आणि निकेल या धातूंपासून ही नाणी तयार केली होती. या नाण्याचं वजन पाच ग्रॅम एवढे असून त्याचा व्यास 23 मिलीमीटर आहे. या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हे नाणे टांकसाळात आल्याचे सालदेखील छापण्यात आले आहे.

अधिक वाचा - Math Teacher Dance Video: बाईंचा डान्स पाहून गुरुजींना घालता येईना आवर, ठुमके पाहून फुटेल हसू

असे कमवा हजारो रुपये

मीडियातील वृत्तानुसार जर तुमच्याकडे अशा प्रकारची नाणी असतील, तर त्यांची ऑनलाइन विक्री करून तुम्ही पैसे कमावू शकता. अशा प्रकारच्या एका नाण्याला सध्या एक हजार रुपये एवढा भाव दिला जात आहे. वेगवेगळ्या ऑनलाइन क्लासिफाईड प्लॅटफॉर्मवर ही नाणी तुम्ही विकू शकता. या प्लॅटफॉर्मवर नाणी विकणारा आणि खरेदी करणारा हे थेट एकमेकांशी व्यवहार करू शकतात. त्यासाठी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक अकाउंट ओपन करावे लागेल. त्यावरून लॉगिन करून तुमच्याकडे असणाऱ्या नाण्यांचे तपशील, त्याचे मूल्य आणि नाण्याचा फोटो अपलोड करावा लागेल. एकदा ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर इच्छुक खरेदीदार तुम्हाला थेट संपर्क करू शकेल.

अधिक वाचा - Police saved life: चालत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पोलिसाने वाचवलं मृत्यूच्या दाढेतून, पाहा VIDEO

पुरातन वस्तूंचे महत्त्व

जुनं ते सोनं, ही म्हण आपल्याकडे रुढ आहे. एखादी वस्तू ज्यावेळी पुरातन होते, त्यावेळी त्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होते. ही बाब त्या वस्तूचे मूल्य वाढवते आणि त्यासाठी भरमसाठ रक्कम मोजायला लोक तयार होतात. काही महिन्यांपूर्वीच बाजारात आलेला सर्वात जुना आयफोन दसपट किमतीला विकला गेल्याची घटना घडली होती. ऐतिहासिक वस्तू, शस्त्रास्त्रे आणि इतर गोष्टींनाही प्रचंड मूल्य असते. त्याचप्रमाणे स्वतंत्र भारतातील पहिली नाणी सध्या दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळेच या नाण्यांचे मूल्य वाढत आहे. तुमच्याकडे अशी नाणी असतील आणि तुम्हाला पैशांची गरज असेल, तरीही नाणे विकून तुम्ही भरपूर पैसे कमावू शकाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी