मायलेकाचा असा इमोशनल तुम्ही पाहिला नसेलच, दोघांच्या सहा वर्षानंतर झालेल्या भेटीने जिंकली लाखोंची मने

emotional video : 6 वर्षानंतर मुलगा आईला भेटला तेव्हा काय घडलं जाणून घ्या, हा व्हायरल व्हिडिओ प्रत्येकाला भावूक करणारा आहे.

You may not have seen such emotional mother and child, the meeting of the two after six years won the hearts of millions
मायलेकाचा असा इमोशनल तुम्ही पाहिला नसेलच, दोघांची सहा वर्षानंतर झालेली भेटीने जिंकले लाखोंचे हृदय  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर आई-मुलाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • सहा वर्षांनंतर आई-मुलाची भेट
  • विद्यार्थ्यांनी सरप्राईज दिलं

मुंबई : आई हा केवळ शब्द नसून भावना आहे. याचेच उदाहरण आज एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा 6 वर्षांनंतर आपल्या आईला भेटतो आणि आईला पाहून त्याची प्रतिक्रिया सर्वांच्या हृदयाला भिडते. आई आणि मुलाचा हा इमोशनल व्हायरल व्हिडिओ तुम्हीही पाहा. (You may not have seen such emotional mother and child, the meeting of the two after six years won the hearts of millions)

प्रशिक्षकाला दिलं सरप्राईज

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ ब्राझीलचा असून या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती आपल्या कुटुंबापासून दूर राहतो. असे सांगितले जात आहे की, हा व्यक्ती 6 वर्षांपासून त्याच्या आईला भेटलेला नाही. हा माणूस व्यवसायाने कॅपोइरा प्रशिक्षक आहे. तो मार्शल आर्ट्स, नृत्य आणि एरोबिक्स शिकवतो. ही व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना कॅपोइरा शिकवत आहे. त्याच वेळी, त्या व्यक्तीच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांना माहित होते की तो 6 वर्षांपासून त्याच्या आईला भेटला नाही, त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सरप्राईज देण्याचा प्लॅन केला आणि त्याच्या आईला ब्राझीलला बोलावले.


आईला पाहून रडू लागला

त्याचवेळी, व्हिडिओमध्ये दिसत आहे की तो  जमिनीवर बसला आहे आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्याचवेळी त्याची आई समोर आल्यावर त्यांना पाहून तो रडू लागला आणि तिला मिठी मारतो. आई आणि मुलाचा हा भावनिक क्षण पाहून आजूबाजूला उभे असलेले लोकही रडताना दिसले.

हा व्हिडिओ ggodnews_movement ने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीला तो खूप आवडला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 65 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचवेळी एका यूजरने कमेंट करत म्हटले की, आईच्या कुशीपेक्षा सुरक्षित जागा नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी