या नोकरीतून प्रत्येक महिन्याला मिळेल 2 लाख रुपयांचा पगार, लगेच करा अर्ज

जगात नोकरीची कमी नाही, फक्त नोकरी शोधण्याची आणि मिळेपर्यंत संयम ठेवण्याची गरज असते. आ

You will get a salary of Rs 2 lakh every month from this job,
दर महिन्याला 2 लाख रुपयांचा मिळेल पगार  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • Yappy.com नावाच्या साईटला मुख्य पपी ऑफिसरची (Chief Puppy Officer) गरज
  • वर्षाकाठी 24 लाख रुपयांचं पॅकेज
  • 9 ते 5 वाजेपर्यंत कुत्र्यांची देखभाल(Dog Caretaker) करण्यासाठी लाखो रुपयांचा पगार

नवी दिल्ली : जगात नोकरीची कमी नाही, फक्त नोकरी शोधण्याची आणि मिळेपर्यंत संयम ठेवण्याची गरज असते. आतापर्यंत तुम्ही अनेक नोकरीविषयी जाणून आहात. त्यात काही खूपच निराळ्या नोकऱ्या असतील पण त्यात तुम्हाला पगार मात्र बक्कळ मिळत असेल. काही कंपन्या तुम्हाला फक्त झोपा काढण्यासाठी पैसे देतात.. तर काही कंपन्या मेकअप प्रोडक्ट्स चाचणी करण्यास किंवा ट्राय करण्यासाठी बक्कळ पैसा देत असतात. आज आपण अशाच नोकरीविषयी जाणून घेणार आहोत. 
कुत्र्यांचा संभाळ करण्यासाठी मिळतील लाखो रुपये 

टीमडॉग्स (Teamdogs) की रिपोर्टनुसार, एक कंपनी कुत्र्यांना खाऊ घालण्याच्या मोबदल्यात 2 लाख रुपये देते. हे वाचून तुम्हाला धक्का लागला ना? परंतु इतका पगार देणारी नोकरी खरंच आहे. Yappy.com नावाच्या साईटला मुख्य पपी ऑफिसरची (Chief Puppy Officer) गरज आहे. या नोकरीची माहिती म्हणजेच जॉब डिस्क्रिप्शन (Job Description) जेडी (JD) इतर नोकरींपेक्षा खूपच वेगळा आहे. परंतु पैसा मात्र इतर नोकरींच्या तुलनेत नक्कीच जास्त मिळेल. 

कुत्र्याला नेहमी ठेवा खूश

ही नोकरी त्याच उमेदवाराला मिळेल जे 9 ते 5 वाजेपर्यंत कुत्र्यांची देखभाल(Dog Caretaker)  करू शकतील. पपीला 8 तास खूश ठेवावे लागणार आहे आणि कुत्र्याचा आवडीची खेळणी देऊन त्याच्यासोबत खेळावे लागणार आहे. याचबरोबर पपीवर, कुत्र्यावर  रिसर्च पण करावा लागणार आहे. 

वर्षाला कमाई होणार 24 लाख 

प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये म्हणजेच वर्षाकाठी 24 लाख रुपये मिळतील. ही नोकरी मॅनचेस्टरमध्ये निघाली आहे. वर्षाला मिळणारं पॅकेज पाहता आपलं आयुष्य सुकर करण्यासाठी इतके पैसे पुरेसे आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी