Viral Wedding : तरुणीने लग्न केले सावत्र भावाशी, आई-वडिलांना तयार केले असे...लग्न झाले व्हायरल

Viral Wedding : सोशल मीडियावर लग्नाशी निगडीत सर्व गोष्टी आणि गोष्टी व्हायरल होतात. हे व्हिडिओ अनेक वेळा वधू किंवा वर त्यांच्या मजेदार कृत्यांमुळे प्रसिद्ध (Wedding video) होतात. तर कधी त्यांचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य व्हायरल होतात. मात्र लग्नासारख्या संवदेनशील मुद्द्याबाबत एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. यात एका तरुणीने चक्क तिच्या भावाशी लग्न केले.

Viral Wedding
व्हायरल लग्न  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सावत्र भावंडांचे लग्न व्हायरल
  • फिनलंडमधील लग्नाचा किस्सा
  • सावत्र बहीणीने सावत्र भावाशी केले लग्न

Girl Marriage With Her Step Brother : नवी दिल्ली :  लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे लग्न या विषयाची खूप जास्त चर्चा होते. सोशल मीडियाच्या (Social Media) जमान्यात तर लग्नाशी संबंधित फोटो, व्हिडिओ यांची रेलचेल असते. सोशल मीडियावर तर काही वेगळ्या किंवा वादादित विषयाचे फोटो किंवा व्हिडिओ लगेच व्हायरल (Viral) होतात. खासकरून लग्नाशी निगडीत सर्व गोष्टी आणि गोष्टी व्हायरल होतात. हे व्हिडिओ अनेक वेळा वधू किंवा वर त्यांच्या मजेदार कृत्यांमुळे प्रसिद्ध (Wedding video) होतात. तर कधी त्यांचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य व्हायरल होतात. मात्र लग्नासारख्या संवदेनशील मुद्द्याबाबत एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. यात एका तरुणीने चक्क तिच्या भावाशी लग्न केले. तो मुलीचा सावत्र भाऊ आहे. आता विचित्र लग्नासाठी या दोघांनी आपल्या आई-वडिलांना कसे तयार केले, त्यांची परवानगी कशी मिळवली यासंदर्भातील कथाही रंजक आहे. (Young girl marriages to her step brother, video goes viral on social media)

अधिक वाचा  : ट्विटरनंतर फेसबुकमधून 11 हजार कर्मचाऱ्यांना काढले

सावत्र भावंडे

हे विचित्र प्रकरण आहे युरोपातील फिनलंड देशातील एक शहरातील. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार ही दोन सावत्र भावंडांची कथा आहे. यातील मुलाचे नाव माटिल्डा आणि मुलीचे नाव समुली आहे. हे दोघे सावत्र भाऊ-बहीण आहेत. यातील विशेष बाब म्हणजे जेव्हा तीन वर्षांपूर्वी मुलाच्या आईचे आणि मुलीच्या वडिलांचे लग्न झाले तेव्हाही हे दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि दोघेही रिलेशनमध्ये होते. म्हणजे त्यांच्या आईवडीलांचे दुसरे लग्न होण्यापूर्वीच ते एकमेकांच्या प्रेमात होते.

अधिक वाचा  : तुरुंगात बाहेर येताच संजय राऊतांना कोणाचा फोन?

आधीपासून सुरू होती डेटिंग

या कथित भावा-बहीणीची भेट मुलाच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाल्याचे वृत्त आहे. गंमत म्हणजे नेमके त्यावेळी त्यांचे पालकही एकमेकांना डेट करत होते. यानंतर आई-वडिलांनी लग्न केल्यावर दोघांनीही त्यांना लग्नासाठी राजी केले. यासाठी दोघांनाही काही विशेष अडचण आली नाही आणि ते दोघेही लगेच हो म्हणाले. कारण मुलगा आणि मुलगी आधीच एकमेकांच्या प्रेमात होते. आई वडीलांच्या लग्नानंतर ते सावत्र भावंडे झाले.

अधिक वाचा- Bank Strike Update: पुढील आठवड्यात देशभरात बँक संप, एटीएमसह इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

आता या दोन्ही सावत्र भावंडांचे लग्न झाले आहे आणि ते आपले सुखी जीवन जगत आहेत. प्रसार माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या पालकांनी सांगितले की, दोघे एकत्र राहणे चांगले आहे. कारण दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत आहेत. या विचित्र लग्नाची आणि विचित्र नात्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. या लग्नाचा किस्सा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियाच्या जमान्यात एखादी गोष्ट व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही. मग ती एखादी घटना असो, बातमी असो की व्हिडिओ. सोशल मीडियावर लग्नाचा हा किस्सा प्रचंड व्हायरल झाला असून युजर्स यावर तुफान प्रतिक्रिया देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी