Shocking VIDEO: लग्नात नाचता-नाचता खाली कोसळला अन्..., धक्कादायक व्हिडिओ आला समोर

VIRAL VIDEO: लग्नसमारंभात नाचता-नाचता अचानक एक तरुण खाली कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

youth died after fall down while dancing in marriage ceremony shocking video goes viral
Shocking VIDEO: लग्नात नाचता-नाचता खाली कोसळला अन्....., धक्कादायक व्हिडिओ आला समोर 
थोडं पण कामाचं
  • नाचता-नाचता कोसळला तरुण
  • लग्नसमारंभातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
  • नाचताना खाली कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

दिनू गावित, नंदुरबार

youth collapse, dies while dancing in marriage ceremony: लग्नसमारंभ म्हटलं की सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. पाहुण्यांचे आगमन, गाणी, संगीत, नृत्य या सर्वांमुळे एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो. असेच आनंदाचे वातावरण असताना एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे. ही घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. लग्न समारंभात नाचता नाचता एक तरुण खाली कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शेगवे येथील रहिवासी राहुल विजय राठोड हा तरुण मित्रांसोबत चिमणीपाडा येथे लग्न समारंभात गेला होता. त्यावेळी नाचताना अचानक त्याला चक्कर आली आणि जमिनीवर कोसळला. त्यानंतर मित्रांनी त्याला लगेच उचलून दवाखान्याकडे धाव घेतली. पण राहुल या तरुणाने रस्त्यातच जीव सोडला.

हे पण वाचा : या भाज्या खरेदी करायला जाल तर खिसा रिकामा कराल

लग्नात नाचताना अचानक चक्कर येऊन तरुण खाली कोसळून काही वेळातच दगावल्याने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत दुर्दैवी या घटनेमुळे शेगवे येथील राहुलच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राहुलच्या मित्रांनी देखील या घटनेबाबत दुःखद भावना व्यक्त केल्या आहे.

हे पण वाचा : ही औषधी वनस्पती घशाच्या समस्यांवर रामबाण उपाय

सूत्रांच्या माहितीनुसार राहुल बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल मिश्रित ताडी सारख्या घातक पदार्थाचा व्यसन करत असल्याची माहिती दिली आहे. कदाचित व्यसनामुळे अस्वस्थतेने चक्कर येऊन शरीरावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वत्र लग्न समारंभ सुरू असून तरुणाई गावागावात लग्नासाठी फिरत असताना शरीराला हानिकारक घातक व्यसनाचे सेवन करत असल्याने असे प्रकार घडून येत आहे. आजच्या पिढीतील तरुणाईने वेळीच स्वतः सुधारणा करून वाईट मार्गापासून वळणे हाच भविष्याचा सुकर मार्ग आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी