Viral News | सायकलवरून वाटप करणारा झोमॅटो डिलिव्हरी बॉय ...आधी होता शिक्षक...इंटरनेटवर एका मुलामुळे मिळाली बाइक...पाहा व्हिडिओ

Zomato Delivery Boy : तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल अशी एक कहाणी समोर आली आहे. इंटरनेटच्या जमान्यात काय होऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण आहे. आपण आता जी घटना जाणून घेणार आहोत ती सोशल मीडियावर व्हायरल (Viral News) झाली आहे. तर मित्रांनो ही कहाणी आहे राजस्थानातील एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयची. खरंतर हा माणूस आधी शिक्षक होता मात्र नशीबाने परिस्थितीच अशी आणली की डिलिव्हरी बॉयचे (Zomato Delivery Boy)काम करून पोट भरायची वेळ आली.

Teacher turned Zomato Delivery Boy
परिस्थितीमुळे शिक्षक झाला झोमॅटो डिलिव्हरी बॉय, पाहा व्हायरल व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • दुर्गाशंकर मीना या इंग्रजीच्या शिक्षकाची कहाणी
  • दुर्गाशंकर 4 महिन्यांपासून डिलिव्हरी बॉयचे काम करतोय, याआधी 12 वर्षे शिक्षक म्हणून काम करत होता
  • 18 वर्षीय ग्राहक आदित्य शर्माला थंड पेयाची डिलिव्हरी देत असताना घडला प्रसंग

Teacher-turned Zomato agent gets bike : नवी दिल्ली : तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल अशी एक कहाणी समोर आली आहे. इंटरनेटच्या जमान्यात काय होऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण आहे. आपण आता जी घटना जाणून घेणार आहोत ती सोशल मीडियावर व्हायरल (Viral News) झाली आहे. तर मित्रांनो ही कहाणी आहे राजस्थानातील एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयची. खरंतर हा माणूस आधी शिक्षक  होता मात्र नशीबाने परिस्थितीच अशी आणली की डिलिव्हरी बॉयचे (Zomato Delivery Boy)काम करून पोट भरायची वेळ आली. राजस्थानच्या (Rajasthan)भिलवाडा येथील इंग्रजी शिक्षक दुर्गा शंकर मीना (Durga Shankar Meena) यांची कोरोना महामारीच्या संकटात नोकरी गेली. आता उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याने झोमॅटोचे वितरण एजंट (Teacher turned Zomato Delivery Boy)म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र नशीबाचे फासे पाहा, त्याने कधी कल्पनादेखील केली नसेल की एका ऑर्डरमुळे तो ट्विटरवर लोकप्रिय होईल. त्याला नेटिझन्सचे आभार कसे मानायचे हेच कळत नाहीये. (Zomato Delivery Boy who lost his teaching job in corona, gets bike with help of 18 year old customer's tweet)

अधिक वाचा : Viral News: लैंगिक सुख मिळवण्याच्या नादात व्यक्तीने गुप्तांगात घातले डंबल, डॉक्टरांनी कपाळावर मारला हात

नोकरी गेल्याने झाला डिलिव्हरी बॉय

दुर्गा शंकर मीना एका 18 वर्षीय आदित्य शर्माला शीतपेय देत असताना ही घटना घडली. जेव्हा तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असताना त्याच्या सायकलवरून ग्राहकांना घरोघरी डिलिव्हरी पुरवणाऱ्या डिलिव्हरी एजंटच्या मेहनतीमुळे आदित्यवर प्रभाव पडला. आदित्य आणि दुर्गाशंकर मीनाचे बोलणे सुरू असताना आदित्यला कळले की मीना बी.कॉम आहे आणि नुकतीच त्यांची नोकरी गेली आहे. यानंतर ही गोष्ट आपल्या ट्विटर हॅंडलवर टाकावी असे आदित्यला वाटले.

कडक उन्हात फूड डिलिव्हरी 

आपल्या ट्विटमध्ये आदित्य शर्मा म्हणतो,"आज माझी ऑर्डर वेळेवर पोहोचली आणि मला आश्चर्य वाटले, यावेळी डिलिव्हरी बॉय सायकलवर होता. आज राजस्थानच्या या कडक उन्हात माझ्या शहराचे तापमान 42 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तरीदेखील माझी ऑर्डर वेळेवर दिली." "मी त्याच्याबद्दल काही माहिती मागितली. त्याचे नाव दुर्गाशंकर मीना असून तो 31 वर्षांचा आहे. तो 4 महिन्यांपासून हे काम करतो आहे आणि महिन्याला जवळपास 10 हजार कमावतो आहे. दुर्गाशंकर एक शिक्षक आहे आणि गेल्या 12 वर्षांपासून शिकवतो आहे" 

अधिक वाचा : Optical Illusion: ऐकलं का! ६ मुली पण पायांच्या फक्त ५ जोड्या, जाणून घ्या काय आहे सत्य

मोटरसायकलची आवश्यकता

आदित्य आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतो की दुर्गाशंकरला इंटरनेटबद्दल सर्व काही माहित आहे आणि त्याने त्याला सांगितले की त्याला वाय-फाय कनेक्शनसह स्वतःचा लॅपटॉप हवा आहे जेणेकरून तो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवू शकेल. कारण सध्या सर्व काही ऑनलाइन चालू आहे. मीनाने त्याला असेही सांगितले की त्याने बँकेकडून कर्ज घेतले आहे. तो झोमॅटोवर फूड डिलिव्हरी करण्याचे काम जास्त कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी काही पैसे वाचवून मोटरसायकल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे.

क्राउंड फंडिंगने उभारले पैसे

"दुर्गा मला म्हणाला की 'तुम्ही जर माझ्या डाउनपेमेंटची व्यवस्था करू शकत असाल तर मी माझा ईएमआय स्वतः भरेन आणि मी तुमचे डाउनपेमेंट 4 महिन्यांच्या आत व्याजासह परत करीन'. मित्रांनो, मला 75,000 चे क्राउडफंडिंग उभारायचे आहे. मला माहित आहे की ही खूप मोठी रक्कम आहे. पण जर हे ट्विट 75 हजार लोकांपर्यंत पोचले आणि प्रत्येकाने 1 रुपया दिला तर आम्ही त्याची बाईक घेण्याची इच्छा पूर्ण करू शकतो,” असे पोस्ट ट्विटरवर आदित्यने केले.

अधिक वाचा : Viral: ऐकाव ते नवलच! चक्क लाईव्ह सामन्यात कपडे काढून मैदानात आली महिला

ट्विट झाले व्हायरल, पडला पैशांचा पाऊस

आदित्य मीनाच्या कहाणीने प्रभावित झाला आणि त्याला मोटारसायकल मिळेल अशा क्राउडफंडिंग विनंतीसह सोशल मीडियावर शेअर केला. आदित्यने क्राउड-फंडिंगद्वारे 75,000 रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु सोशल मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ते अवघ्या दोन तासांत सुमारे 1.90 लाख रुपये जमा करू शकले.
या निधीतून आदित्यने मीनाला एक नवीन स्प्लेंडर बाइक भेट दिली. तसेच जमा झालेल्या उरलेल्या पैशातून कर्ज फेडण्यास सांगितले आहे. त्यांनी ट्विटरवर दुर्गा शंकराचा फोटो पोस्ट करून त्यांची स्थिती आणि कामाबद्दल सांगितले.

आदित्यने मीनाला एका मोटारसायकल शोरूममध्ये नेले जिथे दुर्गाशंकरन मीनाने ९०,००० रुपयांना बाइक विकत घेतली. मीनाला बाइकची चावी मिळताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इंटरनेट आणि सोशल मीडियाची जबरदस्त सकारात्मक शक्ती यातून दिसून आली.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी