क्वारंटाइन सेंटरमध्ये निघाला ४ फुटांचा लांब कोबरा साप, व्हायरल झाला व्हिडिओ [Video] 

व्हायरल झालं जी
Updated Jun 05, 2020 | 18:53 IST

Cobra in Quarantine center: क्वारंटाइन सेंटरमध्ये ४ फुटांचा लांब कोबरा साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ खूप  व्हायरल झाला आहे. 

थोडं पण कामाचं

  • क्वारंटाइन सेंटरमध्ये निघाला ४ फुटांचा लांब कोबरा साप
  • विषारी साप  निघाल्याने एकच खळबळ उडाली
  • सापाला रेस्क्यू करण्याचा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल 

भुवनेश्वर :  देशात कोरोना महामारीमुळे अनेक ठिकाणी लोकांना वेगळ ठेवण्यासाठी क्वारंटाइन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. शाळा, मंगल कार्यालयांचा आसरा या क्वारंटाइन सेंटरसाठी घेण्यात आला. ज्यांना कोरोना होण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींना या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. पण बऱ्याचशा क्वारंटाइन सेंटरमध्ये लोकांचे हाल होत असल्याच्या बातम्या समोर आल्या. अनेक ठिकाणी स्वच्छतेची समस्या, तर काही ठिकाणी वीज नाही. तर काही ठिकाणी लोकांना जेवण मिळत नव्हतं. 

अशा एका क्वारंटाइन सेंटरमध्ये कोबरा साप निघाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ओडिशाच्या भुवनेश्वरजवळील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये घडली आहे. या ठिकाणी सुमारे ४ फूट लांब साप निघाला. त्यामुळे क्वारंटाइन सेंटरमध्ये चांगलीच पळापळ झाली. यावळी क्वारंटाइन सेंटरमध्ये एकूण २० नागरिक उपस्थितीत होते. कोबरा एका पायरीच्या खाली सापडला. 

प्रशासनाने घटनेनंतर त्वरित सापाला पकडण्यासाठी हेल्पलाइनला सूचित केले. त्याननंतर काही स्वयंसेवक सापाला वाचविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओ एका व्यक्ती हातात एक विषारी कोबरा पकडलेला दिसत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी