कोईम्बतूरमध्ये कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

व्हायरल झालं जी
Updated Aug 01, 2018 | 16:59 IST | Times Now

कोईम्बतूरमध्ये बस स्टॉपवर उभ्या असेलल्या लोकांना भरधाव वेगाने आलेल्या कारने अक्षरश: चिरडले.

car rammed
कारची धडक 

कोईम्बतूर : कोईम्बतूरमध्ये कारच्या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस स्ट्रॉपवर उभ्या असलेल्या लोकांना भरधाव वेगावे आलेल्या कारने अक्षरश: चिरडले. हे लोक बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभे होते. यावेळी एक भरधाव वेगात ऑडी कार आली आणि लोकांना धडक दिली. त्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाला धडकली. 

ही धडक इतकी भीषण होती की याच रिक्षाचा पार चक्काचूर झाला. या भीषण दुर्घटनेत सात जणांचा नाहक बळी गेला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. पोलाची येथून ही गाडी आली होती. ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. 

पहिल्या फोटोवरून या अपघाताची भीषणता जाणवते. सीसीटीव्ही फूटेजही समोर आले आहे. याच कारने रिक्षाला धडक देण्यापूर्वी बस स्टॉपवर उभ्या असलेल्या माणसांना उडवले. 

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ६ जणांपैकी दोन जण रिक्षामध्ये होते. या घटनेनंतर तेथील स्थानिक लोकांनी ड्रायव्हरला गाडीतून बाहेर काढले आणि त्याला मारहाण केली. तामिळनाडू पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी ड्रायव्हरच्या रक्ताचे नमुने जमा केले असून तो दारु प्यायला होता का हे त्यावरुन समजेल. कोईम्बतूरचे जिल्हा अधीक्षक हरिहरन यांनी यावेळी अपघातातील जखमींची विचारपूस केली. 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
कोईम्बतूरमध्ये कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू Description: कोईम्बतूरमध्ये बस स्टॉपवर उभ्या असेलल्या लोकांना भरधाव वेगाने आलेल्या कारने अक्षरश: चिरडले.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola