VIDEO: मद्यधुंद व्यक्तीने दारूच्या नशेत दुचाकीला लावली आग

व्हायरल झालं जी
Updated May 08, 2020 | 20:16 IST | टाइम्स नाऊ हिंदी

सुर्यनगर पोलीस स्टेशनजवळ सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध दुचाकीला पेटवून दिली.

A drunken man set fire to his two-wheeler while intoxicated
मद्यधुंद व्यक्तीने दारूच्या नशेत दुचाकीला लावली आग  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दारूसाठी पैसे न दिल्याने युवकाने पत्नीची हत्या केली  
  • सापासोबत केल अस काही दाताने केले तुकडे तुकडे
  • गुरुवारी नेशमधील एका व्यक्तीने स्वत: ची दुचाकी पेटवून दुचाकीला आगीच्या स्वाधीन केलं

बेंगळुरू: एका मद्यधुंद माणसाने आपले भान गमावले ही गोष्ट बर्‍याच वेळा सिद्ध झाली आहे. दारूच्या आहारी गेलेली मद्यधुंद माणसे काहीही करामती करतात. हे आपल्याला काही नवीन नाही. दारूच्या नशेत वेगवेगळे स्टंट करणे ही तळीरामांना काही नवीन नसतं. बेंगळूरू असाच एक तळीरामाने केलेला प्रकार समोर आला आहे. बेंगळुरूहून देहभान गमावल्याची एक ताजी बाब समोर आली. येथे गुरुवारी नशेमधील एका व्यक्तीने स्वत:ची दुचाकी पेटवून दुचाकीला आगीच्या स्वाधीन केलं आहे. पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

सुर्यनगर पोलीस स्टेशनजवळ दुचाकीला आग लागल्याची घटना घडली असून येथे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने रस्त्याच्या मधोमध दुचाकीला पेटवून दिली. अस मानलं जात आहे की, ही व्यक्ती नशेच्या स्थितीत होती. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावरुन ये जा करत होती. या व्यक्तीच्या आगीच्या घटनेमुळे मोठा अपघात झाला असता किंवा इतर वाहनांना देखील या आगीमुळे जळाली असती असा अशी शक्यता मोठ्या प्रमाणात होती.

सापासोबत केल असं काही

मंगळवारी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका ३८ वर्षांचा माणूस एका सापावर पळत गेला. असं मानलं जात आहे की हा व्यक्तीही नशेत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असही बोललं जात आहे की, की या व्यक्तीने सापाला आपल्या गळ्यात गुंडाळून ठेवले होते.नंतर त्याने सापाची  कातडी काढून त्याचे तुकडे तुकडे केले. साप वाटेवर आला तेव्हा ती व्यक्ती दारू विकत घेऊन आपल्या गावी परत जात होता.

युवकाने पत्नीची हत्या केली  

उत्तर प्रदेशमधील जौनपार जिल्ह्यात दारू खरेदीसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका २५ वर्षीय व्यक्तीने पत्नीची हत्या केली. या व्यक्तीने आपल्या चार वर्षाच्या मुलासमोर ही घटना घडवून आणल्याचे सांगितले जाते. दीपक सिंह असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी