[VIDEO] कुत्र्याला तलावात उचलून फेकणारा नराधम कॅमेऱ्यात कैद 

Man throws dog in lake: भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावरील कुत्र्याला थेट तलावात फेकत असल्याचं दिसतं आहे. 

dog
[VIDEO] कुत्र्याला तलावात उचलून फेकणारा नराधम कॅमेऱ्यात कैद   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कुत्र्याला तलावात फेकणारा नराधम कॅमेऱ्यात कैद
  • आरोपीवर पोलीस कारवाईची केली अनेकांनी मागणी
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण घटना आली समोर

भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ (Bhopal) येथे पशुलाही लाजवेल अशी घटना घडली आहे. कारण येथे एका माणसाने कुत्र्याला (Dog) तळ्यात (Lake) फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी संपूर्ण घटना कॅमेऱ्यात (Camera) कैद झाली आहे. हा संपूर्ण व्हिडिओ (Video) आता सोशल मीडियावर (social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. हा व्हिडिओ भोपाळमधील एका तलावावर शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक माणूस भटक्या कुत्राला उचलून थेट तलावात फेकून देताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, वन विहारजवळील बोट क्लब रोडवर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये कुत्र्याला पाण्यात टाकणारा एक तरुण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता पोलीस कारवाई देखील सुरु झाली आहे. 

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, आरोपीची नाव सलमान असल्याचं समजतं आहे. याप्रकरणी अनेक सेवाभावी संस्थांनी (एनजीओ) आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ४२९ (आयपीसी) (कोणत्याही प्राण्याची हत्या किंवा हत्येचा प्रयत्न) या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे आता आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत. 

यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. देशात एखाद्या प्राण्यावर अत्याचार केल्याची ही पहिली घटना नाही. यावर्षी जुलै महिन्यात माकडाला छळ केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर ४ लोकांना पोलिसांनी अटकही केली होती. तसंच त्यांना ६० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला होता.

औरंगाबादेत कुत्र्यासोबत अत्याचार

दरम्यान, ५ जून रोजी औरंगाबाद येथे दोन तरुणांनी कुत्र्याच्या अशाच प्रकारे छळ केला होता. यावेळी तरुणांनी दुचाकीला एका दोरीने कुत्रा बांधला. सुरुवातील दुचाकी हळू चालविली मात्र, नंतर जोरात पळविली. गाडी जोरात पळविल्यामुळे कुत्र्याला पळता आले नाही आणि तो पडला. त्यानंतरही या तरुणांनी दुचाकी न थांबवता तशीच पुढे पळवली. त्यामुळे कुत्र्याला गळ्याला फास बसला. तरीही त्यांनी त्या  कुत्र्याला काही अंतर फरफटत नेले. यामध्ये कुत्रा गंभीररित्या जखमी झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी