VIDEO: बिअरने भरलेल्या ट्रकची टोलनाक्याला धडक आणि मग...

व्हायरल झालं जी
Updated Sep 22, 2018 | 09:42 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

आजपर्यंत तुम्ही एकापेक्षा एक असे अजब-गजब व्हिडिओज पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ अपघाताचा आहे मात्र, अपघातानंतर असं काही घडलं जे पाहून तुम्हीही चकीत व्हाल.

A truck rams into toll plaza in Rajasthan
VIDEO: बिअरने खचाखच भरलेला ट्रक टोलनाक्याला धडकला आणि मग... 

जयपूर : अजमेर येथील किशनगढ टोलनाक्यावर शुक्रवारी एका ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. बिअरच्या बाटल्यांनी खचाखच भरलेल्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटतं आणि तो ट्रक थेट टोलनाक्याला धडकतो. या अपघातात ट्रकचे चक्क तीन तुकड्यांत विभाजन झाल्याचं दिसतं. तसेच ट्रकमधील बिअरच्या बाटल्या आजुबाजुला असलेल्या वाहनांवर पडून फुटतात.

या अपघातात ट्रक चालक आणि टोलनाक्यावरील कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. जखमींवर किशनगढ येथील यज्ञनारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच टोलनाक्यावरील दोन वाहनांचंही नुकसान झालं आहे. ट्रकच्या लेनमध्ये येऊन धडकला त्या लेनमध्ये केवळ दोनच वाहनं होती अन्यथा मोठा अपघात घडला असता.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, किशनगढ टोलनाक्यावर वाहतूक नियमितपणे सुरू आहे. मात्र, त्याच दरम्यान एका ट्रक चालकांचं नियंत्रण सुटतं आणि तो ट्रक थेट टोलनाक्यावर येऊन धडकतो. ट्रकची टोलनाक्याला धडक बसल्यावर नंतर जे काही होतं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

ट्रकचा अपघात होताच बिअरने भरलेल्या बाटल्या उडून थेट ट्रकच्या बाहेर पडतात आणि फुटतात. बिअरच्या बाटल्या फुटल्याने ट्रक समोर असलेल्या कार वर पूर्ण बिअर पडते. या अपघातानंतर संपूर्ण टोलनाका परिसरात बिअरचा वास पसरला. शुक्रवारी घडलेली ही घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: बिअरने भरलेल्या ट्रकची टोलनाक्याला धडक आणि मग... Description: आजपर्यंत तुम्ही एकापेक्षा एक असे अजब-गजब व्हिडिओज पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ अपघाताचा आहे मात्र, अपघातानंतर असं काही घडलं जे पाहून तुम्हीही चकीत व्हाल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola