Auto Driver dance in water logging: महाराष्ट्रासोबतच शेजारील गुजरात राज्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे गुजरातमधील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता हवामान विभागाने महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात पावसात झालेल्या विविध घटनांत आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये 63 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याच दरम्यान गुजरातमधला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होणारा व्हिडिओ हा एका रिक्षाचालकाचा आहे. हा व्हिडिओ गोध्रा रेल्वे स्थानक परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओत दिसत आहे की, रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात रिक्षाचालक आपली रिक्षा थांबतो आणि त्यानंतर भर पावसात डान्स करु लागतो.
रिक्षाचालकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे आणि त्यावर अनेक कमेंट्सही येत आहेत.