स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेसोबत झालं असं काही की त्याचा व्हिडिओ झाला व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated May 28, 2019 | 19:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

बंगळुरूतील एका महिलेच्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्याने दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून समजेल.

 accident
स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेसोबत झालं असं काही की त्याचा व्हिडिओ झाला व्हायरल  |  फोटो सौजन्य: Times Now

बंगळुरू: रस्त्याने गाडी चालवताना 'रोड सेफ्टी'बाबत आपण विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. पण असं अनेकदा होतं की, पुरेशी काळजी घेतल्यानंतरही काही दुर्घटना या घडतातच. बंगळुरूमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे  स्कूटीवरून जाणाऱ्या एका महिलेचा अचानक अपघात झाला. पण सुदैवाने ती या अपघातातून थोडक्यात बचावली. महिला आपल्या स्कूटीवरून भरधाव वेगाने जात असताना रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अचानक स्कूटीवरून खाली पडली. प्रचंड रहदारी असलेल्या या रस्त्यावर ही महिला अगदी थोडक्यात बचावली. पण या अपघातात तिला थोडीशी दुखापत देखील झाली आहे. दरम्यान, हा भीतीदायक व्हिडिओ एका कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी घडली आहे. बंगळुरूच्या  ब्याटारायणपुरा या परिसरातील पंथ्रापल्या मेट्रो स्टेशनच्या खाली हा अपघात घडला. या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, महिलेने बाइक चालवताना हेल्मेट घातलं आहे. त्यामुळे या अपघातात ती थोडक्यात बचावली. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात ती आपल्या गाडीचा तोल सांभाळू शकली नाही. त्यामुळे ती अचानक खाली पडली आणि काही अंतर घसरत गेली. 

ही महिला एवढ्या जोरात खाली पडली की, तिने घातलेलं हेल्मेट हे देखील दूर फेकल्या गेलं. तिचं हेल्मेट हे त्याच बाजूने जाणाऱ्या एका रिक्षाला जाऊन धडकलं. या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येईल की, या अपघातानंतर तिथून जाणाऱ्या अनेकांनी तात्काळ गाडीजवळ धाव घेत महिला मदत केली. महिलेला उठण्यास काही जणांनी मदत केली तर काहींनी तिची गाडी उचलून बाजूला ठेवली. या अपघातानंतर ही महिला अतिशय घाबरली होती. पण सुदैवाने तिला कोणतीही गंभीर दुखापत झाला नाही. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बंगळुरूमधील सोमापूर गेटजवळील एनआयसीई रोडवरील डिव्हाइडरला एका कारने दिलेल्या धडकेत कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ३१ वर्षीय इंटीरिअर डिझानर असलेल्या या व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला होता तर त्याची पत्नी आणि मुलगा हे गंभीर जखमी झाले होते.

रस्ते अपघातात सलग वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी रस्त्यावरून जातान पुरेशी काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी सुरक्षेचे उपाय म्हणून हेल्मेट सक्ती देखील करण्यात आली आहे. पण अनेक जण ही सक्ती झुगारून आणि आपला जीव धोक्यात घालून रस्त्याने गाड्या चालवत असल्याचं दिसून येतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेसोबत झालं असं काही की त्याचा व्हिडिओ झाला व्हायरल Description: बंगळुरूतील एका महिलेच्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्याने दुचाकी चालवत असताना हेल्मेट घालणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून समजेल.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola